NCP Merger : 'शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन होणार', आतली बातमी साहेबांच्या आमदाराने जाहीर सांगितली!

Raju Khare Sharad Pawar Ajit Pawar : अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येत जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढत आहेत. मात्र, या निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा दावा आमदार राजू खरे यांनी केला आहे.
Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Ajit Pawarsarkarnama
Published on: 
Updated on: 

Raju Khare News : जिल्हा परिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती झाली आहे. पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढत आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन होणार आहे, असा दावा आमदार राजू खरे यांनी केला आहे.

राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. ते म्हणाले, 'दोन्ही पक्ष एक झाले आहेत. अजितदादा आणि पवारसाहेबांची युती झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक झाले, आम्ही सोलापूर जिल्ह्यात एकत्र लढलो. आतली गोष्ट तुम्हाला सांगतो गेल्या आठवड्यात बारामतीला आमची बैठक झाली.'

'बैठकीला आमच्या जिल्ह्यातील चार आमदार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील होते. दोन जिल्हाध्यक्ष एक तुतारीचे जिल्हाध्यक्ष आणि घड्याळाचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा उपस्थित होते. आमची सव्वादोन तास मिटींग झाली. या मिटींगमध्ये अजितदादांनी सांगितले की, ही नगरपरिषदेची निवडणूक मग महानगरपालिकेची निवडणूक आणि नंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागोपाठ निवडणूक लागल्यामुळे आम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्याची घोषणा आम्हाला करता आली नाही.', असे खरे यांनी सांगितले.

'आता या निवडणुकीच्या निकालानंतर अधिकृतपणे पवार परिवारातून घोषणा होईल आणि तुतारी अजितादांच्या पक्षात विलीन होणार. आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार होणार. सत्ताधारी पक्षाचा आमदारा म्हणून निधी आम्हाला मिळणार.', असे देखील खरे यांनी सांगितले.

दूधात तूप पडणार...

राजू खरे म्हणाले, 'आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार होणार. माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध चांगले आहे.शिवाय एकनाथ शिंदे साहेबांचा खास माणूस म्हणून मला दुधात तूप मिळणार. त्यामुळे निधी आम्हाला जास्त मिळणार विरोधकांना काही मिळणार नाही.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Sunetra Pawar, Parth Pawar
Sharad Pawar | Sunetra Pawar
ncp Logo
Nitin Karale | Sharad Pawar NCP |Mlc Election