Sharad Pawar News : माजी मुख्यमंत्र्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना जम्मू-कश्मीरमधून समोर आली. माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते फारूक अब्दुला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने ते यातून बचावले. गोळीबार करणाऱ्या कमल सिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आपण मागील 20 वर्षांपासून अब्दुला यांना मारण्याची वाट पाहत होतो, असा धक्कादायक खुलासा कमल सिंग याने केला आहे. पोलिस त्याच्याकडे अधिक तपास करत असून अब्दुला हे लग्न समारंभासाठी आले असताना ही घटना घडली. दरम्यान, या घटनेवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला तसेच उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी उपस्थित असलेल्या लग्नसमारंभात झालेला गोळीबार अत्यंत चिंताजनक आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.
तथापि, अशा प्रकारच्या घटना सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आणि धोकादायक ठरू शकतात. सर्व मान्यवर सुरक्षित असल्याचे वृत्त ऐकून समाधान वाटते. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सततच्या सुरक्षिततेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, असे देखील पवार यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.