Jyotiraditya Scindia : पुणे शहराशी माझा फारच जुना, पारिवारीक आणि जवळचा संबंध आहे. आमचा प्रयत्न एवढाच आहे की नागरी विमान क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती व्हावी. त्यात पुणे हे राज्यातील मुख्य आणि ऐतिहासिक शहर असून येत्या काळात पुण्यातील विमानतळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. तर पुणे विमानतळावर शहराचा इतिहास आणि संस्कृती पहावयास मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले.
ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते. ते आज पुणे दौऱ्यावर होते. तसेच त्यांनी नागपुरातील मिहान सेझ येथे AAR-INDAMAR MRO देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल सुविधेचे उद्घाटन केले. त्यानंतर ते पुणे येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पुणे विमानतळ आणि टर्मिनलची माहिती घेतली. तर 2030 पर्यंत भारतात 200 विमानतळ हा आमचं संकल्प असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आणि त्यांच्या आदेशाने देशात विकास आणि प्रगतीची नवीन सुरुवात झाली. महाराष्ट्रात पुणे हे मुख्य आणि सांस्कृतीक शहर आहे. त्याचा विकास झाला पाहिजे, तसेच नागरी विमान वाहतूक क्षेत्रातही या शहराची प्रगती झाली पाहिजे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची पुण्याच्या नागरी प्रश्नांच्या संदर्भात आग्रही भूमिका आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
फक्त राज्यात नाही तर संपूर्ण देशात पुण्याची क्षमता महान आहे. पुण्याच्या विमानतळावर आपल्याला या शहराचा इतिहास आणि संस्कृती पाहायला मिळते, असेही ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. तसेच पुणे नवीन विमानतळ आणि टर्मिनलची इमारत शनिवारवाडा सारखी प्रतिकृती असलेली उभारली गेली आहे.
एखाद्या वाड्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दीपस्तंभ दिसतो आणि त्यानंतर आमचे मार्गदर्शक शिवाजी महाराज यांचा पुतळा दिसतो, अशा पद्धतीने याची रचना करण्यात आली आहे. पुण्यात पहिला आश्वारुढ शिवाजी महाराज यांचा पुतळा माझे पणजोबा आणि शाहू महाराज यांनी उभा केला. त्यामुळे माझी या शहराशी भावनिक नाळ जोडली गेली असल्याचे ते म्हणाले.
पुणे विमानतळाच्या संदर्भात अनेक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येत्या दोन ते तीन आठवड्यात पुण्यातील विमानतळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार असून देशात सात ते आठ नवीन विमानतळ आणि टर्मिनल तयार झाली आहेत. त्यांचेही उद्घाटन लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तर 2030 पर्यंत भारतात 200 विमानतळ हा आमचं संकल्प असल्याचे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.