शिवसेनेतील फुटीनंतर शाखाप्रमुखापासून, नगरसेवक, आमदार, खासदार यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. ही गळती थांबण्याचं नाव घेत नाही. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडणाऱ्यांना ठणकावलं आहे.
"ज्यांना जायचे उघड जा. पण, पक्षात राहून दगाबाजी करू नका," असा इशारा उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी माजी नगरसेवकांना दिला आहे. ते मुंबई पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, "आपलं आणि भाजपचं हिंदुत्व हे वेगळं आहे. हिंदुत्व म्हणजे तोडा, फोड आणि राज्य करा, असं नाही आहे. आपल्यातील काहींना फोन येत असतील. तसेच, याने पक्ष सोडला, त्यानं पक्ष सोडला, असं कानावर येते. जायचं तर उघड जा. पण, पक्षात राहून दगाबाजी करू नका."
"मी आणि शिवसेनाप्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक राहतील. त्यांना घेऊन मी लढाई जिंकून दाखवेन. पैसे मिळत आहेत, म्हणून आईशी गद्दारी करू नका. माजी नगरसेवक जात आहेत, त्यांनी आताच जावं. एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहिन, या हेतूने मी उतरलो आहे. जे राहतील ते माझ्या मागे. समोर असतील ते माझे शत्रू असतील. कालपर्यंत माझ्या घरातील लोक माझ्याच घरावर चालून येत आहेत," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
"अनिल देशमुखांनी सांगितलं, मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीसांनी डाव रचले होते. सगळं सहन करून मी जिद्दीनं उभे राहिलो आहे. एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन," असा इशारा ठाकरेंनी फडणवीसांना दिला आहे.
"अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष आणि चिन्ह नाही आहे. पण, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी आव्हान देत आहे," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.