Sharad Pawar On Anti-Hindi Protest : राज ठाकरे यांनी पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध करत पाच जुलैला मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना यामध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले आहे. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत एकच आणि एकत्र मोर्चा निघणार सांगितले. उद्धव ठाकरे देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोर्चात सहभागी होणार की नाही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांना पत्रकारांनी राज ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले असल्याचे विचारले असता ते म्हणाले, दोन्ही ठाकरेंची भूमिका वाचली. मुबंईला गेल्यावर याबाबत त्यांना भेटेन. त्यांनी मोर्चात सहभागी व्हा असं म्हटलं आहे, त्यांचे भाष्य समजून घेतलं पाहिजे. तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावर होता येत असे नाही. भूमिका समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय असतील तर भूमिका घेतली जाईल.'
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत बोलताना पवार म्हणाले शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगले आहे. ते एकत्र येतील की नाही हे मला माहिती नाही. कारण हे एकत्र येण्यासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत, असे मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.
सरकारच्या पहिलीपासून हिंदीच्या अंमलबजावणीबाबत शरद पवार यांनी विरोध दर्शवला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील लोक हिंदीच्या विरोधात नाही. मात्र, पहिली ते चौथी हिंदी सक्ती योग्य नाही. हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. पाचवीपासून हिंदी शिकवण्यात हरकत नाही. माझं म्हणणं आहे की पहिले ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती नको.
आणीबाणीवरून भाजप नेत्यांकडून इंदिरा गांधी आणि काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे. आणीबाणी विरोधी दिवस देखील भाजपकडून साजरा करण्यात आला. याबाबत पत्रकरांनी विचारले असता शरद पवार म्हणाले, आणीबाणीबाबत इंदिरा गांधी यांनी माफी मागितली की नाही हे बघावं. आणि माफी मगितल्यावर पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या आहेत हे देखील त्यांनी बघावं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.