Sharad Pawar News: सत्तर दिवसांनी विधानसभेची निवडणूक, तयारीला लागा; अकोलेत शरद पवारांचे संकेत

Political News : सत्तर दिवसांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. आता विधानसभेच्या तयारीला लागा. तुम्ही सर्व एकत्र असाल तर कुणीही धक्का लावू शकत नाही. सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहत नाही.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत तुम्ही उत्तम काम केले आहे. पाच वर्षापूर्वी काँग्रेसला एक व राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्या याचा अभिमान आहे. एक नवी दिशा देशाला दाखवली असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. सत्तर दिवसांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. आता विधानसभेच्या तयारीला लागा. तुम्ही सर्व एकत्र असाल तर कुणीही धक्का लावू शकत नाही. सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहत नाही. आता काही मागायचं नाही ठरवलंय. तुम्ही मला अनेकदा निवडून दिले आहे. आता फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायचंय. ते आणण्यासाठी तुमची शक्ती हवी असल्याचे यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar News)

शेती शेतकरी या संदर्भात अनेक प्रश्न आहेत. काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुत्र वापरणं आजचे राजकारणी करत नाहीत. शेतीमालाची किंमत कुणी जास्त मागत नाही. किमान उत्पादन खर्च द्या, ही मागणी आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुधधंदा केला जातो. दुधाला रास्त किंमत देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.

त्यासोबतच नाशिक, नगर, सोलापूर, सातारा येथील शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात. कांद्याला रास्त भाव मिळाला पाहीजे ही मागणी आहे. मात्र रास्त भाव देण्याची सरकारची तयारी नाही. तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताहात मात्र आम्हाला कांद्याला दर द्या ही शेतक-यांची मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Sharad Pawar
IAS Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकरला मोठा झटका; IAS पद जाणार? UPSC गुन्हा दाखल करणार

कांद्याचे किंमत मागण्याचा अधिकार मोदींच्या राज्यात नाही. ऊसाची शेती करणारा शेतकरी देशाची गरज भागवतो. आजच्या मोदी सरकारनी साखरेच्या निर्यातीला बंदी घातली आहे. ऊस उत्पादकांच्या मागणीची पुर्तता केली जात नाही.आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणी शेतकरी यांची आस्था नाही. आता तुमची आमची जबाबदारी असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar
Sharad Pawar NCP : दिंडोरीसाठी आघाडीत भाऊगर्दी, पण उमेदवारीचे निकष ठरले; श्रीराम शेटेंनी वाढवली इच्छुकांची धडधड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com