Supreme Court hearing : शिंदेंच्या आमदारांना अपात्रतेची धास्ती? भाजपमध्येही सर्वांना जागा मिळणार नाही; ठाकरेंच्या वकिलांच्या पोस्टने खळबळ

Asim Sarode’s prediction News : या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालाचे कायदेशीर आणि राजकीय परिणाम आपल्या पोस्टमधून मांडले आहेत.
Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आले आहेत. निकाल काय लागणार, याबाबत उत्सुकता असतानाच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कायदेशीर प्रक्रियेत सहभागी असलेले वकील असीम सरोदे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

शिवसेना (एकनाथ शिंदे) (Eknath Shinde) यांच्यासाठी प्रतिकूल निकाल आल्यास एकनाथ शिंदे भाजपमध्ये विलीन होण्याचा पर्याय निवडू शकतात; मात्र त्यांच्या सर्वच आमदारांना भाजपमध्ये स्थान मिळेल असे नाही, असा अंदाज सरोदे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात ठाकरेंच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली, तर शिंदेंकडून ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालाचे कायदेशीर आणि राजकीय परिणाम आपल्या पोस्टमधून मांडले आहेत.

'शिंदेंना भाजपमध्ये पर्याय, पण सर्व आमदारांना जागा नाही'

असीम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपमध्ये विलीन होण्याचा पर्याय असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पाठबळ मिळू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, शिंदे यांच्यासोबत असलेल्या सर्वच आमदारांना भाजपमध्ये सामावून घेतले जाईल, असे नाही, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. भाजपमध्ये आधीच अनेक नेते असल्याने शिंदे गटातील काही जणांना प्रवेश मिळणे कठीण ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काही आमदारांसह भाजपमध्ये असतील आणि त्याच वेळी दुसऱ्या राजकीय पक्षाची धुरा सांभाळतील, असे वेगळे राजकीय चित्रही निर्माण होऊ शकते, अशी शक्यता सरोदे यांनी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Shivsena Supreme Court hearing : शिवसेना कोणाची, अंतिम निकाल कधी? ठाकरेंच्या वकिलाने दिली मोठी अपडेट

स्वतंत्र पक्ष स्थापणार की दुसरा पर्याय निवडणार?

सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये आणखी काही शक्यतांचा उल्लेख केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रतिकूल आल्यास एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा पर्याय स्वीकारावा लागू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच एखाद्या अस्तित्वात असलेल्या छोट्या पक्षाचा आधार घेण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. या संदर्भात त्यांनी पश्चिम बंगालमधील काही राजकीय घडामोडींचा दाखला दिला. मात्र, हे सर्व सरोदे यांनी व्यक्त केलेले राजकीय अंदाज आहेत. शिंदे गट किंवा भाजपने (BJP) अशा कोणत्याही पर्यायाची अधिकृत घोषणा केलेली नाही.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Savitha Shan : इस्त्राईल-इराणमध्ये युद्ध पेटलेलं असतानाच अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थिनीची हत्या; २१ वर्षीय सविता शान कोण?

'पक्ष आणि चिन्ह बदलल्यास आमदारांना एकत्र ठेवण्याचे आव्हान'

शिवसेना पक्षाचे नाव किंवा धनुष्यबाण चिन्हाबाबत प्रतिकूल निर्णय झाल्यास शिंदे यांच्यासमोर पक्षसंघटना टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहील, असे सरोदे यांनी म्हटले आहे. शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार, खासदार आणि पक्षसंघटनेतील पदाधिकाऱ्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागू शकते, असा त्यांचा अंदाज आहे.

सरोदे यांनी शिंदे गटाच्या राजकीय भूमिकेवरही कठोर टीका केली आहे. केवळ सत्तेच्या आधारावर उभे राहिलेले राजकीय समर्थन किती टिकाऊ ठरते, याची परीक्षा अशा परिस्थितीत होईल, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
NCP president : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण होणार? पदाचा इतिहास एका क्लिकवर...

निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरही प्रश्न

असीम सरोदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादात निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. विधिमंडळातील आमदारांच्या संख्येला महत्त्व देऊन शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या चुकीचा असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच तत्कालीन राज्यपालांची भूमिका आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत घेतलेल्या निर्णयावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे योग्य पालन झाले नसल्याचे सरोदे यांचे म्हणणे आहे. या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाकडून महत्त्वाचे कायदेशीर स्पष्टीकरण मिळू शकते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
BJP News : भाजप नगरसेवकानेच साजरी केली टिपू सुलतान यांची जयंती? व्हिडिओ व्हायरल होताच दिले स्पष्टीकरण

'निकाल केवळ ठाकरेंसाठी नव्हे, तर इतर पक्षांसाठीही महत्त्वाचा'

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादातील निकाल हा केवळ उद्धव ठाकरे यांच्यापुरता मर्यादित राहणार नाही, असे सरोदे यांनी म्हटले आहे. पक्षांतरबंदी कायदा, राज्यपालांचे अधिकार, विधानसभा अध्यक्षांची भूमिका आणि राजकीय पक्षाच्या संघटनात्मक अस्तित्वाबाबत या निकालाचे व्यापक परिणाम होऊ शकतात, असा त्यांचा दावा आहे.

या प्रकरणात ठाकरे गटाच्या वकिलांच्या टीमचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे, अनिल देसाई, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे आभारही मानले आहेत. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या कायदेशीर युक्तिवादांचा जवळून अनुभव घेता आल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागतो, यावर पुढील राजकीय समीकरणांबाबतच्या चर्चांची दिशा ठरणार आहे. मात्र, संभाव्य अपात्रता, भाजपमधील प्रवेश किंवा नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चा या अंदाजांच्या पातळीवरच आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.