Shiv Sena symbol case : शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत ठाकरेंच्या वकिलांना सुप्रीम कोर्टाने खडसावले, म्हणाले, 'बेजबाबदार...'

Supreme Court hearing News : कोर्टाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत बेजबाबदार विधाने टाळा असे सांगत सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना खडे बोल सुनावले.
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

New Dehli News : सुप्रीम कोर्टात शुक्रवारी शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत बेजबाबदार विधाने टाळा असे सांगत सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. त्यासोबतच आता या प्रकरणी पुढील सुनावणी 30 जुलैला होणार आहे.

शिवसेनेत (Shivsena) 22 जून 2022 ला उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार व 13 खासदार सोबत घेत बंडखोरी केली होती. त्यावेळेस पासून सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह या दोन्हींचा वाद हा सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात पार पडली. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कोर्टासमोर ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या वकिलांनी युक्तीवाद केला. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच ही सुनावणी संपली.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Shiv Sena symbol case : शिवसेना कोणाची? सुनावणीचा 'फायनल काऊंटडाऊन' सुरू; सर्वोच्च न्यायालयात 'या' तारखेला होणार आरपारची लढाई!

सुप्रीम कोर्टात शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी प्रकरण आल्यानंतर दोन्ही बाजूकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना बेजबाबदार वक्तव्य टाळण्याबाबत खडसावले.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
AAP Became Shivsena: 'आप'ची होणार शिवसेना? आधी ७ खासदार भाजपत गेले आता पंजाबच्या भगवंत मान सरकारला मोठा झटका

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. सुनावणीदरम्यान वकिलांनी प्रकरण प्रलंबित असल्याने त्यावर तातडीने सुनावणी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यावर सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Shiv Sena internal conflict : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते वादाची ठिणगी, थेट राजीनामा देण्याचा इशारा, जिल्हा परिषद सदस्य देखील...

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही, असे बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा,” असे सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान म्हटले. त्यासोबतच शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Shivs Sena News : झेडपीतला गेम फसला, दोन्ही शिवसेना तोंडघशी, भाजपने उट्टे काढले!
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com