Shivs Sena News : झेडपीतला गेम फसला, दोन्ही शिवसेना तोंडघशी, भाजपने उट्टे काढले!

Maharashtra ZP politics News : 2017 मध्ये शिवसेना-काँग्रेस पक्षाने मिळून सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेबाहेर ठेवले होते. त्याचे उट्टे 2026 मध्ये भाजपाने सव्याज काढले, असेच म्हणावे लागेल.
sandipan bhumre, abdul sattar, atul save, ambadas danve
sandipan bhumre, abdul sattar, atul save, ambadas danve Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar ZP Election News : राज्यात आमची युती आहे, असे छातीठोकपणे सांगणार्‍या शिवसेना-भाजप या मित्रपक्षांमध्ये स्थानिक पातळीवर किती वितुष्ट आहे हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून दिसून आले. 2017 मध्ये शिवसेना-काँग्रेस पक्षाने मिळून सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेबाहेर ठेवले होते. त्याचे उट्टे 2026 मध्ये भाजपाने सव्याज काढले, असेच म्हणावे लागेल.

भाजप (BJP) या सगळ्या राजकारणात आणि खेळामध्ये 'धुरंधर' ठरला. तर शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष मात्र पुरता बॅकफुटवर गेला आहे. 22 जिल्हा परिषदेचे सदस्य सोबत असताना शिवसेनेने भाजपला सत्तेबाहेर ठेवत अध्यक्ष पद मिळवण्याचा प्रयत्न केला. पण जुळवाजुळवीच्या गणितात खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार या नेत्यांचा स्वार्थ आडवा आला आणि अख्खा पक्षच आडवा झाला.

sandipan bhumre, abdul sattar, atul save, ambadas danve
BJP News: 'देवाभाऊं'नी जाहीरपणे दिलेली 'ती' घोषणा मंत्री सावेंनी खरी करुन दाखवली; शिवसेनेसह उद्धव ठाकरेंच्या पक्षालाही दिला झटका

तिकडे शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत जाऊन 9 सदस्यांच्या जोरावर झेडपीत महत्वाचे सभापती पद मिळवू पाहत होता. पण या सदस्यांना सुरक्षित ठेवण्यात त्यांना अपयश आले. इगतपुरी, नवी मुंबई, ठाणे, कर्जत आणि गोवा असे पर्यटन करूनही ठाकरेंच्या दोन सदस्यांनी धूम ठोकली आणि नेते अंबादास दानवे यांच्यासह संपूर्ण पक्ष तोंडघशी पडला.

sandipan bhumre, abdul sattar, atul save, ambadas danve
Dharashiv ZP Election : भाजपचे टेन्शन वाढले; धाराशिवचे झेडपी अध्यक्षपद हातातून जाणार? तानाजी सावंतांच्या एका डावाने गणितच बदलले

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर शिंदेंच्या शिवसेनेत जसे संदीपान भुमरे, विलास भुमरे, अब्दुल सत्तार व्हिलन ठरले, तसे पलायन केलेल्या उद्धव ठाकरेंच्या दोन सदस्यांपैकी संजय निकम यांनी थेट अंबादास दानवे यांच्यावरच त्यांनी आपला सौदा केला, आम्हाला डांबून ठेवले, असा आरोप करत खळबळ उडवून दिली. आता संजय निकम कसे खोटारडे आहे, ते कसे हसत खेळत सहलीला आले, तिथे कशी मौज मजा केली याचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल होऊ लागले आहेत.

sandipan bhumre, abdul sattar, atul save, ambadas danve
Parbhani Zp Election: शिवसेनेचा गेम! परभणी झेडपीत भाजप-राष्ट्रवादीने ठेवले सत्तेपासून दूर!

या सगळ्या राजकीय नाट्यात भाजप मात्र सगळं करून सवरून या दोन्ही पक्षांवर कुरघोडी करण्यात यशस्वी ठरले. ठाकरेंचे सदस्य अजूनही आपल्याच पक्षातील लक्तरे वेशीवर टांगत आहेत. अंबादास दानवे यांच्यावर करण्यात आलेले आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. पक्षातीलच निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, सोनवणे यांनी भाजपसोबत संगनमत करून स्वतःचा स्वार्थ साधत पक्षाचे नुकसान केल्याचा आरोप कृष्णा डोणगावकर यांनी केला.

sandipan bhumre, abdul sattar, atul save, ambadas danve
BJP News: 'देवाभाऊं'नी जाहीरपणे दिलेली 'ती' घोषणा मंत्री सावेंनी खरी करुन दाखवली; शिवसेनेसह उद्धव ठाकरेंच्या पक्षालाही दिला झटका

इकडे दोन्ही शिवसेनेत एकमेकांची उणीदुणी अजूनही काढली जात आहेत. तर तिकडे भाजपाने आपला उद्देश साध्य करत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आणत झेडपीत आपली शतप्रतिशत सत्ता स्थापनही केली. महापालिकेपाठोपाठ, झेडपीच्या राजकारणातही भाजपने दोन्ही शिवसेनेला मात देत आता आपणच मोठा भाऊ असल्याचे सिध्दही केले.

sandipan bhumre, abdul sattar, atul save, ambadas danve
Dharashiv Politics : धाराशिव झेडपीतील सत्तास्थापनेचा तिढा सुटला: तानाजी सावंतांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स, शिंदे समजूत काढणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com