

Mumbai News : सुप्रीम कोर्टात गेल्या आठवडाभरापासून धनुष्यबाण चिन्ह अन् पक्षाबाबत सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी सुरु असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. गुरुवारी पुन्हा एकदा कपिल सिब्बल हेच युक्तिवाद करणार आहेत. त्यातच वकील असीम सरोदेंनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या या विधानाने एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढली आहे.
सुनावणी पूर्ण झाल्यानंतर येत्या महिनाभरामध्ये, पुढचा निकाल येईल, असे मला वाटते. त्यामध्ये सत्याचा विजय झालाच पाहिजे. हे इतके दबाव किंवा प्रेशर आलेले आहे म्हणजे नैतिकतेचा दबाव आला आहे. सुप्रिम कोर्टावर की सत्याचा विजय म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा विजय. सत्याचा विजय म्हणजे मूळ शिवसेना जिंकली पाहिजे याचा विजय. त्यामुळे हे जे चिन्ह आहे, धनुष्यबाण हे आता गोठवून टाकले जाईल. म्हणजे एकनाथ शिंदेही वापरणार नाहीत, कदाचित उद्धव ठाकरेही वापरणार नाहीत. शिवसेना हा पक्ष त्यांना परत दिला जाईल. आणि मग एकनाथ शिंदे कोणते तरी नवीन चिन्ह घेतील किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा माध्यमाशी बोलताना असीम सरोदे यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाने आपली स्वायत्तता अन् स्वातंत्र्य बाजूला ठेवल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था राहिलेली नसून ती भाजपची बी-टीम झाली आहे. त्यामुळे त्यांना अधिकार नसताना बक्षीसपत्र लिहून दिल्यासारखे बेकायदेशीर निर्णय दिला असल्याचे असीम सरोदे म्हणाले.
गुरुवारी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या तीन ते चार सुनावणींमध्ये ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू मांडत आहेत. बुधवारी देखील सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.
बुधवारच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला होता. 1999 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुखपद नव्हत, हे यांना 2026 ला कळालं का? असा सवाल यावेळी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक आयोग स्वत:च्या सोईनुसार निर्णय घेतं, असंही यावेळी कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.