Anil Parab : स्वत:ची तुलना संभाजीराजेंशी? सत्ताधाऱ्यांनी घेरलं! अनिल परबांचेही सडेतोड उत्तर, म्हणाले; 'हे कोण?'

Vidhan Parishad Updates : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शुक्रवारी (ता. 7) संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला होता. तर माझा छळ पक्ष बदलण्यासाठी केला असे वक्तव्य केलं होतं. यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
Anil Parab Statement in Budget Session
Anil Parab Statement in Budget Session Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यातच समाजवादी पार्टीने आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब याची स्तुती केल्याने आधीच राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. भैय्याजी जोशी यांच्याही मुंबईतील मराठी भाषेबाबतच्या वक्तव्यावर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गट यावरून चांगलाच आक्रमक झाला असतानाच अनिल परब यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ठाकरे गटाला नामुष्कीचा सामना करावा लागत आहे. परब यांनी शुक्रवारी (ता. 7) संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला होता. तर माझा छळ पक्ष बदलण्यासाठी केला असे वक्तव्य केलं होतं. यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आपली तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली. यामुळे विधानपरिषदेत जोरदार राडा पाहायला मिळाला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले. तर मंत्री नितेश राणे आणि आमदार प्रविण दरेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी जोरदार हल्लाबोल केला.

अनिल परब यांनी, संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला होता. तर माझा छळ पक्ष बदलण्यासाठी केला, असं वक्तव्य केल्याने त्यांना सत्ताधाऱ्यांना विधानपरिषदेत घेरलं. यावेळी नितेश राणे यांनी, यांचा छळ झाला पण याची व्याख्या काय आहे? हे लोकांची घरे तोडण्यासाठी, केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यासाठी फोन करतात. त्यांची सत्ता असताना लोकांचा यांनी छळ केला आणि वर म्हणतात आमचा छळ केला. सत्तेत बसून लोकांचा छळ करणारे हे लोक आहेत, यांनी कंगना रणौत आणि नारायण राणेंच्याबाबत काय केलं असाही सवाल नितेश राणे अनिल परब यांना लक्ष्य करताना केला.

Anil Parab Statement in Budget Session
Anil Parab News : 'माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही', अनिल परब वक्तव्यावर ठाम

'हे कोण लागून गेले' : दरेकर

या वक्तव्यावरून भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी देखील अनिल परव यांच्यावर जोरदार हमलाबोल करताना, "संभाजी महाराजांची तुलना करुन घ्यायला अनिल परब कोण लागून गेले?" असा सवाल करत टीका केली. अनिल परब यांनी आधी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. छत्रपती संभाजी महाराज आमचं प्रेरणास्त्रोत असून ते आमचे आदर्श आहेत. त्यामुळे अशी तुलना करून अनिल परबांनी राज्यपालांच्या अभिषणाचा अवमानही केला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी अशी आमची मागणी आहे.

नाक घासा माफी मागा : शंभुराज देसाई

अनिल परब यांच्या वक्तव्यामुळे सभागहात एकच गोंधळ उठालेला असतानाच शिवसेना (शिंदे गट) नेते शंभुराज देसाई यांनी देखील यात उडी घेतली. त्यांनी "अनिल परब स्वत:ची तुलना संभाजी महाराजांशी केली. जे चुकीचे आहे. महाराष्ट्रातली जनता हे सहन करणार नाही. त्यांनी माफी मागावी. ते जे बोललेले ते शब्द मागे घ्यावेत. संभाजी महाराजांची नाक घासून माफी मागितले पाहिजे. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी शंभुराज देसाई यांनी केलीय.

Anil Parab Statement in Budget Session
Anil Parab: सत्ताधारी घोडेबाजार करण्यात तरबेज! अनिल परब यांनी हॉटेल पॉलिटिक्सचे सांगितले कारण...

सत्ताधारी आपल्या तुटून पडताना दिसताना, कारवाईची मागणी करताना दिसत होते. यावर अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना, सत्ताधाऱ्यांनी आधी माझं भाषण तपासून घ्यावं. संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहेत. त्यांच्या पायावर डोकं ठेवायला मी तयार आहे. त्यात लाज वाटायचं कारण नाही. माझे ते दैवत आहेत. मी त्यांचा अपमान केलेला नाही. पण तसे सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर तुम्ही कामकाजातून ते काढून टाका.

कोणीही उठतंय आणि काहाही बोलतंय, मग आम्हालाही त्यांच्याबद्दल बोलावे लागेल, असा इशारा अनिक परब यांनी सत्ताधाऱ्यांच्या दाव्यावर दिला. तसेच सभागृहाच्या मर्यादा दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत. पण माझ्या तोंडून एखादा शब्द निघाला असेल तर तो कामकाजातून काढून टाकण्याचा, समज देण्याचा अधिकार फक्त सभापती महोदयांना आहे. ना दुसऱ्याला. तो यांना नाही, हे कोण आहेत? असा सवाल परब यांनी केला.

Anil Parab Statement in Budget Session
Anil Parab : 'यजमानांनी बोलवायचे आणि स्वागताला आचाऱ्याने जायचे', सत्ताधाऱ्यांच्या 'या' कृतीवर अनिल परब भडकले

तर संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला, असेच मी बोललो. यात मी चुकीचे काय बोललो? चुकीचे असेल तर तो काढण्याचा अधिकार सभापती महोदयांना आहे. या सदनातील एका सदस्याने आपल्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवलं, आधी त्याची माफी घ्या. त्याची माफी घेणार काय? हे असे आरोप फक्त कोरटरकर, सोलापूरकरांचा विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत, असा आरोप देखील यावेळी परब यांनी केला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com