Mumbai News : राज्यात ऑपरेशन टायगरबाबत जोरात चर्चा सुरु आहे. या ऑपरेशन टायगराबाबत कोणताच खासदार अथवा शिंदे यांच्या शिवसेनेकडून आतापर्यंत अधिकृतरीत्या कोणतीच माहिती दिली जात नसल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच सहापैकी दोन खासदारांनी सह्याच केला नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. या खासदारांवर सध्या कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशा आदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे आता गुरुवारी होत असलेल्या ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला कोण-कोणते खासदार हजर राहणार याची उत्सुकता लागली आहे.
ठाकरे सेनेचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दुसरीकडे दिल्लीत हजर असलेल्या सहा खासदारानी स्वतंत्र गट स्थापनेच्या पत्रावर सही करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेली असल्याची चर्चा एकीकडे रंगली आहे. त्यातच अलर्ट मोडवर आलेल्या ठाकरे सेनेकडून खासदारांची फूट टाळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
त्यातच बुधवारी सकाळी ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडून पावले उचलण्यात आली आहेत. त्यानुसार गुरुवारी सकाळी 11 वाजता दिल्लीत शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्या बैठकीला कोण-कोणते खासदार हजर राहणार हे बैठकींनंतर स्पष्ट होणार आहे. या बैठकीसाठी खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीस खासदार हजर राहणार की नाही यावरून त्यांच्या भूमिकेबाबतचा सस्पेन्स संपणार आहे.
दुसरीकडे बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद देसाई व राजाभाऊ वाजे यांनी भूमिका मांडली तर त्यानंतर या चार खासदारानी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन खासदारांचे स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र आले तर पक्षाला विचारणा केल्याशिवाय त्यावर निर्णय घेऊ नका, असे कळवले आहे. त्यानंतर यावर शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे याबाबत सस्पेन्स वाढला आहे.
दरम्यान, खासदार संजय दिना पाटील, ओम राजेनिंबाळकर यांनी पत्रावर सही केली नसल्याचे प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे संजय दिना पाटील यांनी उद्या दिल्लीत होत असलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले आहे. त्यामुळे याबाबत सस्पेन्स वाढला आहे. त्यामुळे या बैठकीला आता कोणते खासदार उपस्थित राहणार यावरून ऑपरेशन टायगर यशस्वी झाले की बारगळले हे पुढे येणार आहे. गेलेल्या सहापैकी एकही खासदार बैठकीला हजर राहिला तर सहा खासदार नसल्याने ऑपरेशन टायगर बारगळणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.