Shivsena Ubt : शिवाजी पार्कात पोलिसांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक! परवानगी नसल्याने हायव्होल्टेज ड्रामा; उद्धव ठाकरेंचा जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा!

shivaji Park protest News : सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात रविवारी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनासाठी परवानगी नसल्याने पोलीस व ठाकरे यांच्या शिवसैनिकात वाद झाला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : जंतरमंतरवर गेल्या अनेक दिवसापासून काक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना रस्त्यावर उतरून पाठिंबा देत आहे. सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात रविवारी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनासाठी परवानगी नसल्याने पोलीस व ठाकरे यांच्या शिवसैनिकात वाद झाला.

दिल्लीतील जंतरमंतरवर सुरु असलेल्या काक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी शिवसैनिक व पोलिसात परवानगी नसल्याने व स्टेज वाढविण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळाले.

Uddhav Thackeray
Nanded: मराठवाड्यात ऑपरेशन तुडवा 'ऑन' : श्रीकांत शिंदेंनी अनुभवला ठाकरेंच्या शिवसैनिकांचा संताप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील जंतरमंतरवर सुरु असलेल्या काक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २० जुलैला दिल्लीला जाणार होते. मात्र, त्याठिकाणच्या आंदोलनात व्यत्यय निर्माण केला जात आहे. सोनम वांगचुकांना उपोषणस्थळावरून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवाजी पार्क येथे रविवारी आंदोलन केले जाणार आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Live Update : घुले हत्या प्रकरणात एसआयटीला सहकार्य करणार - बजरंग सोनवणे

या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी नसल्याने शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली असतानाच याठिकाणी पोलिसांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. या ठिकाणचा स्टेज वाढवण्यावरून यावेळी पोलिस-शिवसैनिकांत हायव्होल्टेज ड्रामा पहावयास मिळाला. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना शांत केले.

Uddhav Thackeray
Shivsena News : उद्धव ठाकरेंचा पहिला फुटीर खासदार CM फडणवीस यांच्या भेटीला : ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिलेला शिवसेना नेताही सोबत

दरम्यान, सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात रविवारी ठाकरे यांचा पक्ष रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यासोबतच स्टेजवरूनही पोलीस व शिवसैनिकाच्या वाद झाला. याठिकाणी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Uddhav Thackeray
Nanded: मराठवाड्यात ऑपरेशन तुडवा 'ऑन' : श्रीकांत शिंदेंनी अनुभवला ठाकरेंच्या शिवसैनिकांचा संताप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com