Sambhaji Bhide : नीतेश राणेंच्या 'त्या वक्तव्याला' संभाजी भिडेंची हवा? म्हणाले, 'शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते'

Sambhaji Bhide On Chhatrapati Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांचा लढा मुस्लिमांविरोधात होता. त्यांच्या बरोबर कोणताच मुस्लिम मावळा नव्हता असे वक्तव्य काहीच दिवसांपूर्वी मंत्री नीतेश राणे यांनी केलं होतं. ज्यावरून राज्यात वाद सुरू झाला होता.
Sambhaji Bhide
Sambhaji Bhidesarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते, मत्स्यपालन आणि बंदरे मंत्री नीतेश राणे यांची अनेक विधाने वादग्रस्त ठरली आहेत. यातील त्यांच्या, 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लीम सैनिक नव्हता', या दाव्याने खळबळ उडवून दिली होती. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज भाजप नेते तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देताना, आपण नीतेश राणे यांच्या दाव्याशी सहमत नसल्याचे म्हटलं होतं. तर त्यावेळी मुस्लिम सैन्य महारांजाबरोबर नसतं तर आजही आपण गुलामगिरीत असतो असे म्हणत नीतेश राणेंचे कान टोचले होते. यानंतर हे प्रकरण थोड शांत होत असतानाच आता या मुद्द्याला हवा देण्याचे काम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांनी, शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते, असे वक्तव्य करत आता नवा वाद निर्माण केला आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरण जातील आणि धार्मिक दृवीक्ररणाकडे नेलं जात आहे. यातच राज्यातील मंत्रिमंडळात असणारे मंत्री नीतेश राणे मुस्लिम समाजाबद्दल गरळ ओकण्याचे काम करत आहेत. त्यांनी वारंवार या समाजाला टार्गेट करण्याचे काम केलं आहे. तर थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणीच मुस्लिम नव्हता. छत्रपतींची ती लढाई मुस्लिमांच्याविरोधात होती, असे वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे राज्यात एकच वाद निर्माण झाला होता. यावरून अधिवेशानात देखील हा विषय चांगला तापला होता. तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी देखील एक नेपाळी म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. यामुळे सध्या राज्यातले राजकीय वातावरण तापलेलं आहे.

यादरम्यान इतिहासाचा अभ्यास कमी असणारे लोक सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीची माहिती देत असल्याची संतप्त प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिलीय. शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांचा अलौकिक काही लोक आपल्या राजकारणासाठी वापरत आहेत. तर प्राध्यापक, व्याख्याते आणि शिक्षक हे भाडोत्री असल्याची टीका संभाजी भिडे यांनी केलीय.

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide: भिडे गुरुजींनी संभाजीराजेंचा दावाच ठरवला खोटा; म्हणाले, 'रायगडावरील वाघ्या कुत्र्या'ची कथा...

तर स्वतः शहाजीराजे यांनीही हा देश हिंदुत्ववादी आणि हिंदूंचे राष्ट्र करायचे आहे, असे म्हटले होते. मुळातच शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते. शिवाजी महाराजांवर सर्वधर्म समभाव हे लेबल चिकटवले, असाही दावा संभाजी भिडे यांनी केलाय.

यावेळी त्यांनी माजी खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित केलेल्या रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरूनही भाष्य केलं आहे. त्यांनी या स्मारकाला आपला समर्थन असल्याचे सांगितले आहे. तर संभाजीराजे जे सांगत आहेत ते 100 टक्के चूक असून वाघ्या कुत्र्या बाबत आपण वाचलेली कथा सत्य असल्याचा दावा केला आहे.

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide : राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंसह सर्व राज्यकर्त्यांना संभाजी भिडेंनी दिला 'हा' मोलाचा सल्ला

वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य असून त्यामुळेच त्याचे स्मारक रायगडवर उभारण्यात आले. माणसे एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात, असा टोला लगावताना, निदान सध्याच्या काळात देशाशी एकनिष्ठ राहण्यासाठी हे स्मारक प्रतिक असल्याचेही ते म्हणाले. तर फक्त स्वार्थासाठी लोक आपली मते कशीही बदलतात. त्यांना माझे मत पटणार नाही आणि मला माझे मत पटवण्याचा ध्यासही नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com