Yogesh Kadam : घायवळच्या भावाला शस्त्रपरवाना प्रकरण तापलं; अडचणीत आलेल्या योगेश कदमांनी अंग झटकत दाखवले पोलीस आयुक्तांकडे बोट

Yogesh Kadam Slam Anil Parab Over Sachin Ghaiwal weapon license controversy : पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. तर आता सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्यावरून राज्यमंत्री तथा शिवसेना नेते योगेश कदम चांगलेच अडचणीत आले आहेत.
Yogesh Kadam, Nilesh Ghaiwal And Sachin Ghaiwal
Yogesh Kadam, Nilesh Ghaiwal And Sachin Ghaiwalsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावर मंत्री योगेश कदम यांनी पहिली थेट प्रतिक्रिया दिली आहे.

  2. कदम यांनी सांगितले की संबंधित परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीनेच जारी झाला असून त्यांचा त्यात काहीही सहभाग नाही.

  3. अनिल परब यांना कदाचित या प्रक्रियेची माहिती नसेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Mumbai News : पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ यावा देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यावरून सध्या वाद उफाळला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी कदम यांच्यावर गंभीर आरोप करत सरकारवर तुटून पडले. तसेच परब यांनी पुन्हा एकदा कदम यांची हकालपट्टी सरकारमधून करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करताना थेट इशाराच दिला. यानंतर आता घायवळ शस्त्र परवान्यावर प्रकरणावर योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिला आहे. तसेच त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपावरून हात झटकत संबंधित परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीनेच इश्यू झाल्याचा दावा केला. तसेच हे परब यांना कदाचित माहिती नसेल असेही टोला लगावला आहे.

पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणावरून राज्यातले राजकारण ढवळून निघाले असतानाच नव्या प्रकरणामुळे वादंग सुरू झाले आहे. घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्यावरून सध्या वाद सुरू झाला आहे. तो परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सही केली. पोलिसांकडे दिलेल्या अहवालाकडे दुर्लक्ष करत कदम यांनी शस्त्र परवाना दिला.

तर त्यांचे असे करणे पोलिसांचे खच्चीकरण असल्याचा आरोपही परब यांनी केला होता. यावरून आता वाद सुरू झाला असून यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणात आणखी कोण कोण नेते आहेत त्यांची यादीच जाहीर केली आहे. तर विधिमंडळ सभापती राम शिंदे यांचेही नाव घेतल. यामुळे हे प्रकरण अधिकच तापले आहे.

दरम्यान योगेश कदम याचे वडील तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी देखील विधिमंडळातील एका नेत्याच्या सांगण्यावरुन हा निर्णय घेतल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. तर आता योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिलं असून त्यांनी, परब यांना कदाचित माहिती नसेल की परवाना देताना तो संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने इश्यू केला जातो.

Yogesh Kadam, Nilesh Ghaiwal And Sachin Ghaiwal
Yogesh Kadam : घायवळ प्रकरण : मुख्यमंत्र्यांना शेवटची संधी, योगेश कदमांची हकालपट्टी करा; अन्यथा थेट… अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय

तरीही लायसन्स कसे दिले ह्या सर्व आरोपांची माहिती मी लवकरच घेईनच सोबत ती माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगितली जाईल. याबाबत आधीच सोशल मीडियातून स्पष्टीकरण दिलं आहे. तर मी जबाबदारी घेतल्यापासून प्रलंबित गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला परवाना दिलेला नाही. अथवा तशी शिफारसही केलेली नाही. यामुळे परब म्हणतात तसे आमच्याकडून गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आजपर्यंत कधी झालेलं नाही आणि यापुढेही कधी होणार नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.

निर्णय कसा घेतला?

दरम्यान त्यांनी सचिन घायवळ याला परवाना कसा दिला. त्यासाठी कसा निर्णय झाला याचीही माहिती दिली. ते म्हणाले, एखाद्या प्रकरणात अपील होते तेव्हा ती वैयक्तिक अपील असते. ही देखील तशीच होती. तर याही प्रकरणात वक्तीचं कॅरेक्टर कसं आहे हे पाहिलं गेलं. सचिन घायवळवरती 15-20 वर्षांपूर्वी जे गुन्हे दाखल होते, त्या गुन्ह्यातून 2019 मध्ये न्यायालयाने सर्व गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामध्ये, सेटलमेंटसुद्धा नाही, हे सगळे लक्षात घेऊनच मी सब कॉन्सियस माईंडने हा निर्णय घेतला, असे कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

रामदास कदमांचेही राम शिंदेंकडेच बोट

एकीकडे रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर आरोप केल्यानंतर योगेश कदम यांचे वडील आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुण्यातील घायवळ प्रकरणावर थेट भाष्य केलं. त्यांनी विधिमंडळात असलेल्या मंत्र्यांना आदेश देणाऱ्या व्यक्तीने योगेश कदम यांना सांगितल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांचे नाव मुख्यमंत्री यांना पाठवले आहे, त्यांनी शिफारस केल्यानंतर निर्णय घेतल्याचा दावा करताना रामदास कदम यांनी विधानसभा सभापती राम शिंदे यांच्याकडेच बोट दाखवले.

Yogesh Kadam, Nilesh Ghaiwal And Sachin Ghaiwal
Yogesh Kadam News : विधिमंडळात मंत्र्यांनाही आदेश देणाऱ्या व्यक्तीने केली शस्त्र परवान्यासाठी शिफारस! रामदास कदम यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

FAQs :

प्र.1: सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरण काय आहे?
👉 या प्रकरणात शस्त्र परवाना जारी करण्याबाबत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्र.2: योगेश कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली?
👉 त्यांनी सांगितले की परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीने जारी झाला असून त्यांचा यात काही सहभाग नाही.

प्र.3: त्यांनी अनिल परब यांना काय म्हटले?
👉 “परब यांना कदाचित पूर्ण माहिती नसेल,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी दिला.

प्र.4: या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 शिंदे गट आणि उद्धव गटातील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

प्र.5: पोलिस विभागाचा यात काय संबंध आहे?
👉 कदम यांनी स्पष्ट केले की परवाना मंजुरीसाठी अंतिम सही पोलीस आयुक्तांकडूनच केली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com