BJP Vs Shivsena : सरकारी जागेवर हॉटेल, नियम डावलून भव्य प्रोजेक्ट : शिवसेना मंत्र्याविरोधात भाजप आमदाराकडे तक्रारींचा पाढा

pratap sarnaik complaints in narendra Mehta's public darbar : भाजपच्या मिरा रोड येथील मध्यवर्ती कार्यालयात आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकदरबाराचे आयोजन केले होते. या वेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.
Narendra Mehta Vs Pratap Sarnaik
Narendra Mehta Vs Pratap Sarnaiksarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्या जनता दरबारांमधून एकमेकांविरोधात तक्रारी समोर आल्या आहेत.

  2. या माध्यमातून दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष उघडपणे दिसून येत आहे.

  3. आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.

maharashtra leaders political clash news : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या लोकदारबारात आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात तक्रारी आल्या होत्या. आता बुधवारी (ता. २२) मेहता यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात प्रताप सरनाईक यांच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे दोघांनी आयोजित केलेल्या दरबारांच्या माध्यमातून एकमेकांवर निशाणा साधला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपच्या मिरा रोड येथील मध्यवर्ती कार्यालयात आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकदरबाराचे आयोजन केले होते. या वेळी १७३ नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लप्रकल्पाबाबतदेखील तक्रारी करण्यात आल्या.

प्रताप सरनाईक नियमाचे उल्लंघन करून चेना गावात भव्य प्रकल्प उभारत आहेत. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असताना प्रकल्पाला परवानग्या कशा मिळतात, असा प्रश्न जनता दरबारात उपस्थित झाला.

Narendra Mehta Vs Pratap Sarnaik
Pratap Sarnaik News : आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधातील तक्रारींच्या चौकशीसाठी कक्ष, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

त्याचप्रमाणे सरनाईक यांनी सरकारी जागेवर हॉटेल उभारले आहे. या अनधिकृत हॉटेलबाबत अनेक दिवसांपासून तक्रार करूनही प्रशासन कारवाई करीत नाही, अशीदेखील तक्रार लोकदरबारात करण्यात आली. त्यावर तक्रारीची शहानिशा करून मगच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आमदार नरेंद्र मेहता यांनी संबंधितांना दिले.

Narendra Mehta Vs Pratap Sarnaik
Pratap Sarnaik News : मेट्रोच्या पार्किंगसाठी आमदार मेहतांनी जागा द्यावी, मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

FAQs :

1. वाद कशामुळे निर्माण झाला आहे?
दोन्ही नेत्यांच्या जनता दरबारांमध्ये एकमेकांविरोधात तक्रारी आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

2. कोणत्या नेत्यांमध्ये हा संघर्ष आहे?
प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्यामध्ये हा संघर्ष आहे.

3. जनता दरबार म्हणजे काय?
जनता दरबार म्हणजे नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आयोजित बैठक.

4. या प्रकरणावर काय परिणाम होऊ शकतो?
राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून पुढील आरोप-प्रत्यारोप वाढू शकतात.

5. हा वाद कुठल्या राज्यातील आहे?
हा वाद महाराष्ट्र राज्यातील आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com