Eknath Shinde : 'जय गुजरात' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना धू धू धुतले; कच्च मडकं, मुजरा म्हणतं हिणवलंही

Shivsena UBT Sanjay Raut Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना महाराष्ट्राच्या जडणघडणीत गुजराती व्यापाऱ्याचे योगदान असल्याचे म्हटले होते. त्यावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'शिंदे असं बोलून मराठी माणसाचा अपमान करतायेत.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Vs Sanjay Raut : अमित शाह यांच्यासोबतच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना 'जय गुजरात'ची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधु एकत्र येत असताना आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची माहीत देत असताना शिंदेंना धू धू धुतले.

'एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळातील अत्यंत कच्च मडकं आहे. ते सध्याच्या राजकीय परिस्थितीला गोंधळले आहेत. देवेंद्र फडणवीस सारवासारव करून त्यांना अशी विधानं करण्यास प्रोत्साहीत करत आहेत. आणि शिंदे यांनाच अडचणीत आणत आहेत. जय गुजरात हा एकनाथ शिंदेंचा अमित शहांच्या समोर मुजरा सुरू आहे. त्यांनी त्यांचा मुजरा सुरू ठेवावा.', असे संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना महाराष्ट्राच्या जडणघडणीत गुजराती व्यापाऱ्याचे योगदान असल्याचे म्हटले होते. त्यावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'शिंदे असं बोलून मराठी माणसाचा अपमान करायेत. गुजरातच्या बांधवांनी महाराष्ट्रात विकासकामे केली मग पैसे नाही का कमवले? संपत्ती नाही का कमवली? उपकार करतात का? मुंबईच्या उभारणीत सगळ्या मोठे योगदान हे पारसी समाजाचे आहे, मराठी माणसाचे आहे. कष्टकरी मराठी माणसाच्या श्रमातून, घामातून मुंबई उभी राहिली.'

Eknath Shinde
Marathi Vijay Melava: स्वर्गातून बाळासाहेब ठाकरे मराठी जनांना करताहेत..'चलो वरळी'चे आवाहन

शहा, मोदी जय महाराष्ट्र म्हणणार का?

संजय राऊत म्हणाले, शिंदे महाराष्ट्रात जय गुजरात म्हणतात. कारण देतात की गुजराती समोर होते. तिकडे गुजरातमध्ये बडोदा हे मराठी संस्थान आहे. तेथे अमित शहा, नरेंद्र मोदी जय महाराष्ट्र म्हणतील का? ते जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. ग्वालेर, इंदौर मध्ये शिंदे, होळकर मराठी राज्यकर्ते होते. मग त्या राज्याचे मुख्यमंत्री तेथे जाऊन जय महाराष्ट्र म्हणतील का? असा सवाल देखील राऊत यांनी केला.

Eknath Shinde
Sushma Andhare : राज-उद्धव ठाकरे एकत्र येत असताना सुषमा अंधारेंवर मोठी कारवाई; हक्कभंग मंजूर, विशेषाधिकार समिती करणार शिक्षा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com