Sanjay Raut Supreme Court : संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण

Supreme Court seeks an explanation from Sanjay Raut over his remarks, as the Attorney General consents to criminal contempt proceedings : इंडिया आघाडीच्या रॅलीतील विधानांची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल; न्यायालयाच्या फौजदारी अवमान कारवाईसाठी अ‍ॅटर्नी जनरल यांची संमती
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

Supreme Court News : इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयावर काढण्यात आलेल्या रॅलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आहे.

खासदार राऊत यांनी केलेल्या वर्तनावर स्पष्टीकरण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. तसेच संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयाचा फौजदारी अवमान केल्याबद्दल कारवाई सुरू करण्यास अ‍ॅटर्नी जनरल यांनी संमती दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या रॅलीत, न्यायालयाने जनतेसाठी दरवाजे बंद केल्याचा आणि भाजप (BJP) नेत्यांसोबतच्या संबंधांवर गंभीर टिप्पणी केली होती. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, रॅलीत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या बेजबाबदारी वर्तनावरून सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढण्यास सुरवात केली आहे.

यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वर्तनाबाबत गंभीर दखल घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना त्यांच्या वर्तनाबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले.

Sanjay Raut
Supreme Court INDIA bloc SIR plea : सर्वोच्च न्यायालयाचा इंडिया आघाडीला दणका? रॅलीवरून सरन्यायाधीश सूर्य कांत यांची कठोर टिप्पणी

सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीवर अपलोड केलेल्या आदेशात इंडिया आघाडीतील नेत्यांबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली. यात संजय राऊत यांनी आपल्या वर्तनाबाबत स्पष्टीकरण देण्याच्या अटीवर त्यांच्या पुढाकाराने ही याचिका प्राथमिक स्तरावर सुनावणीसाठी स्वीकारण्यात आली आहे. देशाची न्यायव्यवस्था आणि भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयाचा फौजदारी अवमान केल्याबद्दल कारवाई सुरू करण्यास अ‍ॅटर्नी जनरल यांनी परवानगी दिली आहे.

Sanjay Raut
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड; पाच उमेदवारांविरोधात अपात्रतेची याचिका

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी, याचिकाकर्त्यांपैकी एकाला आपल्या वर्तनाबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल. न्यायाधीश बाहेर केल्या जाणाऱ्या वक्तव्यांबाबत अनभिज्ञ नाहीत आणि ते 'हस्तिदंती मनोऱ्यात' राहत नाहीत, अशा कडक शब्दात सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या कडक भूमिकेवरून इंडिया आघाडीतील खासदार संजय राऊत यांच्याभोवती कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत सर्वोच्च न्यायालयासमोर काय स्पष्टीकरण देतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते

जेव्हा देशात हुकूमशाही चालली आहे, मते आणि निवडणुका चोरल्या जात आहेत, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांना भेटण्यास नकार दिला. जेव्हा देश संकटात होता, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जनतेसाठी आपले दरवाजे बंद केले, हे इतिहास नेहमी लक्षात ठेवेल. तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे जवळपास 80 न्यायाधीश लंडनमध्ये भाजप नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळतात, भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्ट्यांना हजेरी लावतात. पण जेव्हा आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी गुहार लावायला येतो, तेव्हा सरन्यायाधीश सांगतात की ते राजकीय नेत्यांना भेटू शकत नाहीत, अशी विधाने संजय राऊत यांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com