Sharad Pawar : 'या' बड्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कुणाला लागणार तिकीटाची लॉटरी?

Assembly Election 2024 : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून तिकीट मिळण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत.
sharad pawar
sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा 'स्ट्राइक रेट' ( शरदचंद्र पवार ) 100 पैकी 80 टक्के होता. त्यामुळे विधानसभेला 'तुतारी' हाती घेण्यासाठी इच्छुकांची रांग लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांनी पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष ( शरदचंद्र पवार ) शरद पवार यांची सोमवारी ( 30 सप्टेंबर ) भेट घेतली.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार बबनदादा शिंदे, काँग्रेसचे नेते, आबा बागुल अमित भांगरे यांनी शरद पवार यांनी भेट घेतली आहे. या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचं बोललं जात आहे.

बबनदादा शिंदे तुतारी घेणार?

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार बबनदादा शिंदे ( Babandada Shinde ) यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आमदार शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे माढ्यातून विधानसभा लढू शकतात. दुसरीकडे शिंदे यांचेच पुतणे धनराज शिंदे यांनीही दंड थोपटले आहेत. त्यांनी 'तुतारी'कडून तिकीटाची मागणी केली आहे. माढ्यातून 'तुतारी'चं वाढलेलं मताधिक्य, पुतण्याचं आव्हान आणि मुलाला विना अडथळा निवडून आणण्यासाठी आमदार शिंदे हे 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता आहे.

sharad pawar
Surendra Pathare: 'साहेब दैवत आहेत, असं म्हणणारे त्यांना का सोडून गेले'; सुनील टिंगरेंची पठारेंनी उडवली खिल्ली

पर्वतीवर दावा कायम; आबा बागुल

पुण्यातील पर्वती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) अश्विनी कदम या इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेसनेही पर्वती मतदारसंघावर दावा सांगितला आहे. आबा बागुल येथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यापार्श्वभूमीवर बागुल यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेत चर्चा केली आहे. "नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार यांनी भेट घेतली आहे. मात्र, पर्वतीवर आमचा दावा कायम आहे. तेथून मी निवडणूक लढविणार आहे," अशी प्रतिक्रिया बागुल यांनी भेटीनंतर दिली.

sharad pawar
Ajit Pawar : अजितदादांच्या राष्ट्रवादीत चाललंय काय? चिंचवडला चार दिवसांत दोन गटांची बंडाळी

शरद पवार यांनी जुलैमध्येच आशीर्वाद दिला; अमित भांगरे

माजी मंत्री मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर लागलीच 'अलर्ट'मोडवर येत अकोले मतदारसंघातून इच्छुक असलेले अमित भांगरे यांनी शरद पवार यांनी भेट घेतली आहे. भेटीनंतर भांगरे यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे. "अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे. इथं गद्दारांना थारा नसतो. आमदारांनी गद्दारी केली, त्यामुळे जनता त्यांना थारा देणार नाहीत. शरद पवारसाहेबांच्या पाठीत आमदार किरण लहामटे यांनी खंजीर खुपसला आहे. पुढील काळात जनता अकोला मतदारसंघात 'तुतारी' वाजल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार यांनी जुलैमध्येच आशीर्वाद दिला आहे," असं भांगरे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com