Sanjay Raut : 'एका पक्षात दोन मुख्यमंत्री होऊ शकत नाही'; संजय राऊतांचा 'NCP' शरदचंद्र पवार पक्षाला टोला

Sanjay Raut on Sharad Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देणार, शरद पवार यांच्या विधानावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

'एका पक्षात दोन मुख्यमंत्री होऊ शकत नाही. तसंच लोकं कोणाच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करणार आहेत, हे अख्खा देश जाणतो. त्यासाठी कोणी घोषणा करण्याची गरज नाही', असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावर त्यांनी महाविकास आघाडीची जागा वाटपाची अंतिम बैठक असणार असल्याचे सांगितले. या बैठकीत जागा वाटप निश्चित होईल, असे सांगून मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर मोठं भाष्य केलं.

Sanjay Raut
Sharad Pawar: ऐन निवडणुकीत शरद पवारांनी जयंत पाटलांवर सोपवली मोठी जबाबदारी

शरद पवार (Sharad Pawar) नी पक्षातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या लवकर मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे जाहीर करताच, जयंत पाटील यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले आहे. यावर महाविकास आघाडीत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर संजय राऊत यांनी भाष्य केले.

Sanjay Raut
NCP Rupali Chakankar : फडणवीसांकडून 'एकाच दगडात दोन पक्षी'; चाकणकर पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी, खडकवासला भाजपकडंच?

राऊत नेमकं काय म्हणाले

संजय राऊत म्हणाले, "पवारसाहेबांचे संकेत असतील, तर आम्ही त्यावर चर्चा करू. पवारसाहेब तसे काही कधी संकेत देत नाहीत. मधल्या काळात रोहित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्याची घोषणा केली होती. आणि एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाही. सुप्रियाताईंचे नाव देखील मधल्या काळात चालले होते. जितेंद्र आव्हाड यांचा देखील मध्यंतरी नावे होते. त्यामुळे एकाच पक्षात पाच ते सहा मुख्यमंत्री कसे होऊ शकतात".

मुख्यमंत्रिपदाची टोलवा-टोलवी

मुख्यमंत्रिपदाचं नेमकं काय? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "मुख्यमंत्रिपदाची टोलवा-टोलवी महायुती आणि महाविकास आघाडीत चालूच राहणार आहे. राजकारण आहे शेवटी. लोकं कोणाच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करणार आहेत, हे अख्खा देश जाणतो. त्यासाठी कोणी घोषणा करण्याची गरज नाही", असे म्हणत उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्रिपदासाठी महाविकास आघाडीत चेहरा असल्याचे संजय राऊत यांनी सुचवले.

भ्रष्ट सरकार घालवायचेय

महाविकास आघाडीत जागा वाटपाचा घोळ सुरूच आहे. कालपासून बैठक सुरू आहे. यावर संजय राऊत यांनी आजच महत्त्वाची बैठक आहे. आज शेवटची बैठक असेल, आज निर्णय घ्यावाच लागेल. निवडणुका लागल्या आहेत. लहान-मोठा भाऊ, असे आमच्या तिघांपैकी कोणाच्याही डोक्यात नाही. भ्रष्ट सरकार घालावे, हेच आमच्या डोक्यात आहेत. हाच आमचा अजेंडा आहे, असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com