NCP Rupali Chakankar : फडणवीसांकडून 'एकाच दगडात दोन पक्षी'; चाकणकर पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी, खडकवासला भाजपकडंच?

Khadakwasala Assembly Elections 2024 : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खडकवासला मतदारसंघातून लढण्याचा इरादा बोलून दाखवला होता. त्यामुळे भाजपच्या गोटात काहीसे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे दिसून येत आहे.
Devendra fadnavis Rupali Chakankar Ajit Pawar
Devendra fadnavis | Rupali Chakankar | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Khadakwasla News : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रातलं वातावरणच राजकीय होऊन गेलं आहे. 288 मतदारसंघासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे.महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप जरी फायनल झालं नसलं तरी घटक पक्षांनी आपआपले 'सेफ' मतदारसंघांवर पूर्ण फोकस केला आहे.यात शहरी,ग्रामीण आणि निमशहरी अशा तीन भागांत विभागला गेलेला खडकवासला मतदारसंघात भाजपनं एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं दिसून येत आहे.

खडकवासला या मतदारसंघाची 2009 मध्ये निर्मिती झाल्यानंतर येथे आजपर्यंत भाजप (BJP) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच अटीतटीची आणि थेट लढत झालेली आहे. सध्या हा मतदारसंघ महायुतीतील भाजपच्या ताब्यात असला तरी त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा डोळा असल्याची चर्चा होती.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी खडकवासला मतदारसंघातून लढण्याचा इरादा बोलून दाखवला होता. त्यामुळे भाजपच्या गोटात काहीसे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे दिसून येत आहे.

त्यांनी महायुती सरकारच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करतानाच खडकवासला मतदारसंघही महायुतीत भाजपच्या पारड्यात पाडून घेतला आहे. तसेही युतीच्या फॉर्म्युल्यानुसार ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याला प्राधान्य हे सूत्रही खडकवासल्यात भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

Devendra fadnavis Rupali Chakankar Ajit Pawar
NCP News : शिवस्वराज्य यात्रेची सांगता, साताऱ्यातील सभेची पुनरावृत्ती.. शरद पवारांच्या सभेवेळी पुन्हा पाऊस; नेमकं काय घडलं

राज्य सरकारने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या रुपाली चाकणकरांच्या नियुक्तीच्या कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी(ता.15) घेतला आहे.त्यानुसार चाकणकर या आता पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच 2027 पर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

अदिती तटकरेंकडे मंत्रिपद असलेल्या महिला आणि बाल विकास विभागाकडून रुपाली चाकणकरांना तीन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देत असल्याचा आदेश जारी केला आहे.पण एकीकडे हे पद मिळवल्यानंतर आता चाकणकरांना खडकवासला मतदारसंघातील उमेदवारीवर पाणी सोडावे लागणार आहे.

राष्ट्रवादीला दावेदारी सोडावी लागणार...

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला समजला जात असलेल्या खडकवासल्यातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नव्हते. तेव्हाच मतदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी भाजपची मैत्री नाकारल्याची चर्चा सुरू झाली होती.

मात्र,त्यानंतरही विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपला आपला पारंपरिक खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी सोडावा लागण्याची शक्यता होती. पण आता चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला खडकवासला मतदारसंघावरची दावेदारी सोडावी लागणार आहे.

Devendra fadnavis Rupali Chakankar Ajit Pawar
CJI Dhananjay Chandrachud News : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा सर्वात मोठा अन् धाडसी निर्णय

खडकवासल्यात प्रतिस्पर्धी कोण असणार..?

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जवळपास 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे.त्यात सचिन दोडके,काका चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

तर दुसरीकडे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश बापू कोंडे हेही पुन्हा खडकवासला मतदारसंघातून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता.मात्र, ऐनवेळी माघार घेतली होती.

Devendra fadnavis Rupali Chakankar Ajit Pawar
Rajeev Kumar Helicopter Emergency landing : मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या हेलिकॉप्टरचं शेतात आपत्कालीन 'लँडिंग'

चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी तापकीरांची तयारी...

मनसेकडून निवडणूक लढवत दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी 2009 मध्ये खडकवासला मतदारसंघात विजय मिळवला होता. मात्र,2011 मध्ये त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे या होत्या. पण तरीही सहानुभूतीची लाट असूनही तापकीर यांचा 3 हजार 625 मतांनी निसटता विजय झाला.

तेव्हापासून या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व वाढतच राहिलं.2011 नंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये तापकीर यांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. आता चौथ्यांदा हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी कसून तयारी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com