

SIR Campaign Maharashtra: महाराष्ट्रात सध्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमे सुरु आहे. यात 15 दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे बीएलओ (Booth Level Officer) म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या प्राथमिक शिक्षिकेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. ही घटना ताजी असताना आणखी एका शिक्षिकेचा SIR ने जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे.
SIR मुळे शिक्षकांवरील ताण वाढतच आहे. EF Digitazation साठी रात्रीचे जागरण, दुसऱ्या दिवशी सकाळची शाळा व त्यातच SIR कामाचा व्याप या तणावात स्मिता मोतेवार (कल्लिरवार) यांचा आज सकाळी अपघात झाला. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जिल्हा परिषद, उच्च प्राथमिक शाळा सेलसुरा (पंचायत समिती, वर्धा) येथे त्या कार्यरत आहेत. या घटनेनंतर शिक्षक संघटनाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
SIR कामामुळे BLO म्हणून नियुक्त काही शिक्षकांना कामे पूर्ण करण्यासाठी सततचा दबाव येत आहे. कारणे दाखवा नोटीस, निलंबन, धमक्या अशा वातावरणार काही शिक्षकांना हार्ट अटॅक आले, कुणी आत्महत्येचा प्रयत्न केला, तर काही ठिकाणी अपघात होत आहेत, असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी 'सरकारमाना'शी बोलताना व्यक्त केले
निवडणूक विभागाच्या यंत्रणेकडून कोणताही सारासार विचार न करता आणि वास्तव दुर्लक्षित करून कारणे दाखवा नोटीस बजाण्यात येत आहे. ३० जुलै पर्यंत SIR चे काम पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्यामुळे बीएलओ मतदारांच्या घरी जाऊन मतदार याद्या अद्यावत करीत आहेत. पण आषाढी वारीसाठी अनेक जिल्ह्यातून पंढरपूरच्या वारीसाठी मतदार गेले आहेत. अशा सर्व विपरीत परिस्थितीत BLO म्हणून नियुक्त हक्काचा गुलाम झालेला शिक्षक, अशी आजची विदारक स्थिती आहे, असे मत राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी 'सरकारमाना'शी बोलताना व्यक्त केले
शेतीची कामे, मोल-मजुरीसाठी जाणारे नागरिक, अनेक मतदारांची अनास्था अशा वातावरणात शिक्षकांनी हे काम कराले लागत आहे. त्यातच प्रशिक्षणात सांगितल्यापेक्षा काम करताना प्रत्यक्ष वेळोवेळी बदलणाऱ्या सूचना. एकीकडे निरागस, निष्पाप असे विद्यार्थी- घर, लेकर, घरातील वृद्ध वाऱ्यावर..दुसरीकडे SIR हेच एकमेव राष्ट्रीय युद्ध स्तरावरील काम, अशा दुहेरी संकटात शिक्षक सापडला आहे.
१९ जुलै पर्यंत काम ५०% अधिक झाले नाही तर तुम्हाला निलंबित करून दुसऱ्या BLO काम सोपवण्यात येईल, असा दबाव निवडून आयोगाकडून आहे. दुसऱ्या BLO ची नियुक्ती करून हे काम करून घेणे शक्य नाही; हे ते साहेब विसरले आहेत. दुसऱ्या कोणाचीही वेळेवर नियुक्ती केलेल्या BLO ला त्या गावाची माहिती नाही, त्याचे प्रशिक्षण झाले नाही, त्याने EF. वितरण केले नाही, मतदारांची ओळख नाही, नेमकी प्रक्रिया कशी चालते याची कोणतीच माहिती नाही. अशा परिस्थितीत दुसऱ्या BLO ला नियुक्त करणे ही पोकळ वल्गना आहे. निलंबित केलेला शिक्षक काही दिवसांनी कामावर येईल, वैद्यकीय रजेवर जाईल. मात्र ज्या कामासाठी मरमर सुरू आहे ते काम पुढे जाणार नाही, असे कोंबे यांनी सांगितले.
28 जून रोजी सुनीता पोपळभट यांनी बीएलओचे साहित्य ताब्यात घेतले होते. त्यानंतर मतदारयादी (Voter List) पुनर्निरीक्षणाच्या कामाचा वाढता दबाव आणि सततचा तणाव यामुळे त्या मानसिक दडपणाखाली होत्या. मंगळवारी (30 जून) त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.