Pankaja Munde PA Arrest : पंकजा मुंडेंच्या पीएला पुन्हा अटक, 'ती' आत्महत्या नव्हे हत्या? एसआयटीची मोठी कारवाई

Gauri Garje Death Case : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे याला एसआयटीने अटक केली आहे. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
PA Anant Garje Gauri Death Pankaja munde
PA Anant Garje Gauri Death Pankaja mundeSarkarnama
Published on
Updated on

Anant Garje News : मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गौरीच्या आई-वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली होती. मात्र, तो जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आला होता.

या प्रकरणी तपास करण्यासाठी सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. आता एसआयटीकडून अनंत गर्जेला अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. अनंतला दुसऱ्यांदा अटक केली असल्याने गौरीचा घातपात झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, अनंतला नेमकी कशासाठी अटक केली याची माहिती समजू शकली नाही.

अनंत गर्जेवर गौरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, आपली मुलीने आत्महत्या केली नसून तीची हत्या केली असल्याचा आरोप गौरीच्या वडिलांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली होती.

PA Anant Garje Gauri Death Pankaja munde
Nashik NMC Elections : नाशिकमध्ये भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरु, पहिल्याच दिवशी घराणेशाहीचे दर्शन

गौरी हिने 22 नोव्हेंबरला गळफास घेत आत्महत्या घेतल्याचे समोर आले होते. अनंत याचे विवाहबाह्य संबंध होते. याची माहिती गौरीला मिळाली होती तेव्हापासून अनंत, त्याचा भाऊ आणि बहीण हे गौरीचा छळ करत होते. तसेच माहेरी काही सांगतिले तर अनंत हा आत्महत्येची धमकी देत होता. तेव्हापासून गौरी ही मानसिक तणावात होती, असे तिच्या वडिलांनी सांगितले होते. मात्र, आपली मुलगी ही आत्महत्या करणारी नसून तिची हत्या करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.

PA Anant Garje Gauri Death Pankaja munde
Nitin Gadkari : संभाजीनगरकरांची प्रतीक्षा संपली! नितीन गडकरींनी सांगितला 'मेगा प्लॅन', शहराच्या विकासाला मिळणार 'बूस्टर डोस'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com