Maharashtra Politics : महाराष्ट्रातील आणखी एक राजकीय घराणं फुटलं! भावाने सोडली जयंत पाटलांची साथ, आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश!

SKP Pandit Patil to Join BJP : पंडित पाटील म्हणाले, 'माझ्या घरावर आजही पक्षाचा झेंडा आहे तो मी काढायचा की नाही हे ठरवेल. माझ्या आई वडिलांनी या पक्षासाठी कष्ट घेतले. जयंत पाटलांनी मला संधी दिली. पण मी काही घरात बसून राहिलो नाही.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Raigad Politics : महाराष्ट्रातील राजकारणात रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे मोठे वर्चस्व होते. पाटील कुटुंबाच्या हाती असलेल्या पक्षामुळे रायगड कधी काळी शेकापचा बालेकिल्ला होता. मात्र आता पाटील घराण्यात फूट पडली असून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाऊ माजी आमदार पंडित पाटील आणि भाचे आस्वाद पाटील यांनी पक्षाला रामराम केला आहे.

पंडित पाटील आणि आस्वाद पाटील हे आज (बुधवारी) भाजपमध्ये आणि हजारो समर्थकांसह प्रवेश करणार आहोत. पंडित पाटील हे अलिबागचे माजी आमदार आहेत. त्यांनी यंदा देखील तिकीट मागितले होते. मात्र, जयंत पाटलांनी त्यांना तिकीट नाकारत आपली सून चित्रलेखा पाटील यांना तिकीट दिले. मात्र, शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी त्यांचा पराभव केला.

Jayant Patil
Eknath Shinde : "घरात बसून कुणालाही..."; राज ठाकरेंची भेट घेताच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं अन् भेटीचं कारणही सांगितलं

पंडित पाटील म्हणाले, 'माझ्या घरावर आजही पक्षाचा झेंडा आहे तो मी काढायचा की नाही हे ठरवेल. माझ्या आई वडिलांनी या पक्षासाठी कष्ट घेतले. जयंत पाटलांनी मला संधी दिली. पण मी काही घरात बसून राहिलो नाही. रायगड जिल्ह्यात पंडितशेठ नाव घेतल्याशिवाय राजकारण होत नाही. रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करू. रायगडमध्ये भाजपला नंबर एक बनवू.'

शेकाप अडचणीत?

रायगड जिल्हा हा कधीकाळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र बालेकिल्ल्यातच शेकापची मोठी पिछेहाट झाली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्षाला सोडून जात आहेत. तर, मोठे नेते देखील संधीच्या शोधात आहेत. जयंत पाटलांच्या घरातच फूट पडल्याने पक्ष आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पंढरपूरच्या अधिवेशनापासून वाद

शेकापचे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पंढपूरमध्ये अधिवेशन झाले होते. या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीवरून पंडित पाटील आणि जयंत पाटील यांच्यात खडाजंगी झाली होती. जयंत पाटलांना थेट आव्हान देत भाई पक्षात दादागिरी करू नका, असे म्हटले होते. पुढे विधानसभेला तिकीट नाकारल्याने हा जयंत पाटील आणि सुभाष पाटील यांच्यातील वाद आणखीच वाढला होता.

Jayant Patil
Nashik Dargah : नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा हटवण्यावरून मोठा तणाव! जमावाकडून दगडफेक, पोलिस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com