
Pune News : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्याला हादरवून सोडले होते. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. तर सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया ही लढाई लढण्यामध्ये मोठी भूमीका पार पाडली होती. मोठ्या लढ्यानंतर या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड आणि इतर आरोपी आज तुरूगांत आहेत. यादरम्यान संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यापैकी एक सुदर्शन घुले याने हत्येची कबुली दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा यावरून शंका उपस्थित केले जात आहेत. तर हे प्रकरण एवढ्यावरच थांबवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस बॅकफुटवर गेल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याची सध्या राज्यभर चर्चा होताना दिसत आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या झाली होती. तर हत्या खंडणीच्या वादातून झाली होती. या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी राज्यभरात मोठ आंदोलन उभारण्यात आलं होतं. यात खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांच्यासह इतर नेते सहभागी होते.
तर दमानिया यांनी उपोषणातून ही लढाई लढली होती. त्या लढाईला अखेर यश आले आणि धनंजय मुंडेंना आपले मंत्रिपद सोडावे लागले. वाल्मिक कराडसह या हत्येत सहभागी असणाऱ्यावर मकोका लावण्यात आला. यादरम्यान आता आरोपी सुदर्शन घुले याने आपल्या कबुली जबाबात देशमुख यांची हत्या आपणच केली असून फोन वर माहिती दिल्याचे म्हटलं आहे. यआवरून दमानिया यांनी प्रतिक्रिया देताना खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस बॅकफुटवर गेल्याची टीका केली आहे.
यावेळी दमानिया यांनी, खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांनी ज्या गोष्टीसाठी लढा दिला आता तेच त्यांच्या अंगलट येईल अशी त्यांना भीती आहे. जे बीडमध्ये सुरू होतं तेच हे देखील करत आहेत. हे आता खोक्याभाईवरून समोर आलं आहे. यामुळे आपण कुठे यात शेकलो जाऊ नये, आपल्याही काही गोष्टी बाहेर येतील या भीतीने आज हे गप्प आहेत. हेच मी 28 डिसेंबर पासून बोलत होते. मी जे आरोप केले त्याबाबत अधिवेशनात एकाही आमदाराने प्रश्न उचलला नाही. आता हे सगळेजण हळूहळू बॅक फुटवर गेले आहेत.
आता या प्रकरणावरून मी हायकोर्टात जाणार असून तेथेच हा प्रश्न मांडणार आहे. याच्याआधी आपण थोडी वाट बघू, कोणी चौकशीची मागणी करतं का बघू याची अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत वाट पाहिली. पण आता हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याचेही त्या म्हणाल्या.
तर धस यांची आताच दाडी पांढरी झाल्याचे पत्रकारांकडून ऐकण्यास मिळाले. याच्या आधी असं कधीच झाले नाही. पण जेव्हा खोक्या भोसले यांची जी प्रकरणं बाहेर आलीत त्यावेळी त्यांची भूमिका काहीशी बदलली. याआधीच उदाहरण पाहा, छगन भुजबळ जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या छातीत कळ येत होती. त्यांची दाढी वाढली होती. पांढरी झाली होती. पण आता छातीत कळ येत नाही आणि दाढी तर. आता असचं काहीसं सतीश भोसलेची प्रकरण बाहेर आल्यावर सुरेश धसांच्या बाबतीत होत आहे. त्यांची देखील दाढी अचानक पांढरी झालेली दिसली. जी आत्तापर्यंत कधी वाढवलेली नव्हती. पण आता कुठेतरी त्यांना हे जाणवायला लागलं की आपण याच्यापुढे जर बोललो तर हे सगळं आपल्यावर शेकलं जाईल आणि आपल्या गोष्टी बाहेर येतील, असाही टोला दमानियांनी लगावला आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.