Latur ST Depot : STचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर 'रितेश-जेनिलिया' होमग्राऊंडवरच तोंडघशी : पावसानंतर लातूरच्या डेपोची दुर्दशा; पैशांआभावी विकासाच्या दाव्यांना तडे

Latur ST depot poor condition after rain: मुसळधार पावसानंतर लातूर एसटी डेपोची झालेली दुर्दशा समोर आली आहे. विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Latur bus depot damaged after rainfall
Latur bus depot damaged after rainfallSarkarnama
Published on
Updated on

Latur bus depot damaged after rainfall: राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा उंचावण्यासाठी काही महिन्यांपूर्वी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची एसटीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, या दोघांनीही कोणतेही मानधन न घेता ही जबाबदारी स्वीकारली. मात्र, ज्या लातूर शहरातून रितेश देशमुख यांचे नाव जोडले जाते, त्याच शहरातील एसटी डेपो आणि बसस्थानकाच्या स्थितीमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

लातूरमधील मध्यवर्ती भागात असलेल्या एसटी डेपोच्या विकासासाठी अनेक वर्षांपासून मागण्या केल्या जात आहेत. नवीन बसस्थानक उभारणे, डेपोचे आधुनिकीकरण करणे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे या बाबी अद्याप कागदावरच असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे एसटीची प्रतिमा सुधारण्याच्या प्रयत्नांना प्रत्यक्षात कितपत यश मिळणार, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Latur bus depot damaged after rainfall
Heavy Rain : मुंबई पाणी तुंबलं, भाजपच्याच आमदाराची कबुली; कालिदास कोळंबकर नेमकं काय म्हणाले?

एसटी महामंडळ आर्थिक अडचणीतून बाहेर पडावे आणि बसस्थानकांचा विकास व्हावा यासाठी सरकारने बीओटी तत्त्वावर विविध प्रकल्प राबविण्याची योजना आखली होती. त्याअंतर्गत लातूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील सुमारे 4 एकर जागेवर व्यापारी संकुल, आधुनिक डेपो आणि बसस्थानक उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, अनेक वर्षे उलटूनही या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही.

अलीकडील पावसानंतर डेपोची अवस्था अधिकच खराब झाल्याचे दिसून आले. डेपोच्या प्रवेशद्वारासह अनेक ठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. पक्का रस्ता नसल्याने पावसाचे पाणी साचते आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. दररोज 100 हून अधिक बस येथे ये-जा करतात. इंधन भरणे, देखभाल आणि दुरुस्तीची कामेही याच ठिकाणी होत असतात. त्यामुळे चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

उन्हाळ्यात धुळीचा त्रास तर पावसाळ्यात चिखल आणि पाण्याच्या खड्ड्यांमुळे कामकाजावर परिणाम होत आहे. डेपोची इमारतही जुनी आणि जीर्ण झाली असून नवीन इमारतीची मागणी अद्याप प्रलंबित आहे.

Latur bus depot damaged after rainfall
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! कुठे होर्डिंग पडले तर कुठे दरडी कोसळल्या; थरकाप उडवणारे PHOTOS आले समोर

दरम्यान, डेपोचे स्थलांतर करायचे की त्याच ठिकाणी आधुनिक सुविधा उभारायच्या यावरही वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे लातूरमध्ये नेमके व्यापारी संकुल उभारले जाणार, नवीन बसस्थानक तयार होणार की अत्याधुनिक डेपो विकसित होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिक प्रतीक्षेत आहेत. निधीअभावी रखडलेल्या विकासकामांमुळे मात्र एसटीच्या प्रगतीच्या दाव्यांना तडे जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com