Mumbai Congress Protest : मदर डेअरीची जागा अदानी समूहाच्या घशात? काँग्रेस आक्रमक; कुर्ल्यात जोरदार आंदोलन

MP Varsha Gaikwad Protest Against Adani Group : मदर डेअरची जागा अदानी समूहाला महायुती सरकारने दिल्यानंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे. तर यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून कुर्ल्यात जोरदार आंदोलन करण्यात आले.
MP Varsha Gaikwad
MP Varsha GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीचे सरकार राज्यातील जनतेसाठी नाही तर अदानी समूहासाठी काम करत असल्याचा आरोप अनेकदा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. धारावी झोपडपट्टीवरून देखील काँग्रेसने आदानी समुहासह महायुतीवर जोरदार टीका केली होती. आता काँग्रेसला महायुतीला घेरण्यासाठी नवा मुद्दा मिळाला असून काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तर नवा वाद हा मदर डेअरीच्या जागेवरून उफाळला आहे.

राज्य सरकारने मदर डेअरीची जागा अदानी समुहाला दिल्याने मुंबई काँग्रेसच्या वतीने आज (ता.23) जोरदार आंदोलन केले. कुर्ल्यामध्ये काँग्रेसने धरणे आंदोलन करताना राज्य सरकार आणि अदानी समुहाचा जाहीर निषेध केला आहे. तसेच राज्य सरकार मदर डेअरीची जागा अदानी समुहाच्या घशात घालत असल्याची टीका केली आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या आजच्या मोर्चात मदर डेअरीच्या जागा अदानी समुहाला न देता तेथे गार्डन बनवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तर आता पुन्हा एकदा 58 एकर जमीन अदानी समूहाला देण्यात आल्यानेच काँग्रेसने निषेध केला आहे.

मदर डेअरीच्या जागा अदानी समुहाला न देता तेथे बोटॅनिकल गार्डन व्हावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांची होती. त्याबाबत प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव डावलून राज्यातील महायुती सरकारने सदर भूखंड अदानीच्या घशात घालण्याचा काम केल्याचा दावा वर्षा गायकवाड यांनी केलाय. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील वर्षा गायकवाड यांनी आहे. तर यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांचे कपडे देखील फाडल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय.

MP Varsha Gaikwad
Varsha Gaikwad : 'राऊतांना उत्तरं द्यायला आम्ही बांधील नाही', काँग्रेसच्या महिला नेत्याची आगपाखड

वर्षा गायकवाड यांनी, पोलिसांनी मदर डेअरमध्ये जाण्यापासून आपल्याला आडवले. यामुळेच येथे धरणे आंदोलन सुरु केल्याचे म्हटले आहे. तर जोपर्यंत पोलिस आम्हाला आत सोडत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन करणार, असे देखील त्यांनी ठामपणे सांगितले.

त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना, लाडक्या मित्रास मोफत भूखंड देण्यासाठीच या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याची टीका देखील वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

MP Varsha Gaikwad
MP Varsha Gaikwad : 'तरी बाबासाहेब नेहमीच "फॅशन"मध्ये राहतील'; खासदार गायकवाडांचा अमित शाह यांना इशारा

तर सदर जागा ही कुर्लाकरांची असून त्यांना ती परत मिळाली पाहिजे. जो नागरीकांचा प्रस्ताव आहे त्याप्रमाणे इथे गार्डन झालेच पाहिजे, असे वर्षा गायकवाड यांनी मागणी केली आहे. तर मुंबई पोलिस नेमकं कोणासाठी काम करत असून अदानीसाठी हे सर्व चालले आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तर हा देश लोकांसाठी आहे की अदानीसाठी आहे असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com