Varsha Gaikwad : 'राऊतांना उत्तरं द्यायला आम्ही बांधील नाही', काँग्रेसच्या महिला नेत्याची आगपाखड

Varsha Gaikwad On Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. यानंतर काँग्रेस बॅकफुटवर गेल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे अनेक नेत्यांनी यावरून टीका केली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला म्हणावे तसे यश आले नाही. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे विरोधीपक्षनेता मिळावा, अशी देखील संख्या नाही. यातच आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून महायुती तयारीला लागली आहे. तर महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता.11) सकाळी स्वबळाचा नारा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर आता आघाडी मोडणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

राऊत यांनी स्वबळाचा नारा देताना, लोकसभा, विधानसभेवेळी आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांना संधी देता आली नाही. यामुळे पक्षावर त्याच्या परिणाम झाल्याचे कारण देत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना वेगळ्या लढणार असल्याचे म्हटले होते. यानंतर काँग्रेसह शरद पवार गटाकडून या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. शरद पवार गटाकडून तर थेट आम्ही काँग्रेससोबत जाऊ अशी कबुली देण्यात आली आहे. तर काँग्रेसने आम्हीही एकटे लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut : पक्ष फोडणे भाजपच्या कुठल्या आयडॉलॉजीत बसते? संजय राऊतांचा खडा सवाल

दरम्यान काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, राऊत यांच्यावर आगपाखड करताना, महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे अशीच आमची इच्छा आणि भूमीका आहे. यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करतोय. याबाबत आता पक्षश्रेष्ठींशी आम्ही बोलू आणि तेच यावर निर्णय घेतील असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

तर संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गायकवाड यांनी राऊत यांनी, अशा गोष्टी थेट माध्यमांमध्ये जाऊन बोलण्यापेक्षा चर्चेच्या माध्यामातून सांगायला पाहिजे होती. ते त्यांच्या पक्षाचं व्यक्तिगत मत मांडत असतील. पण आमच्या पक्षाची भूमीका लवकरच सांगू असंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.

वर्षा गायकवाड यांनी, राऊत यांच्या वक्तव्याचा धागा धरत, आमच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे होती, पण आम्ही आघाडीचा विचार केला. जर तसा विचार केला असता तर मुंबईत आमच्या जागा निवडून आल्या असत्या. लोकसभेला मी काही तिकीट मागितलं नव्हतं तर ते पक्षाने दिलं होतं.

Sanjay Raut
Sanjay Raut : "ती संपूर्ण मविआची वेदना..."; विधानसभेचा पराभव जागावाटपातील घोळामुळे, काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य राऊतांच्या जिव्हारी, म्हणाले...

तसेच आम्हाला विधानसभेत जागा म्हणाव्या तशा जागा मिळाल्या नाहीत. पण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आम्ही निवडून आणलं. मेहनत घेतली. कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन निर्णय घेतला. आता आम्हीही मुंबईपासून नागपूरपर्यंत काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. तो पक्ष श्रेष्ठी घेतील, असाही इशारा काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com