Dhananjay Munde News : धक्कादायक बातमी : वाल्मिक कराड अजूनही मुंडेंच्या संपर्कात? राईट हॅण्ड सातपुडा बंगल्यावर...

Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad News : धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे.
Dhananjay Munde, Saurabh Karad
Dhananjay Munde, Saurabh KaradSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड अजूनही मुंडेंच्या संपर्कात आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कराडचा राईट हॅण्ड असलेला त्याचा पीए सौरभ खराडे मंगळवारी सकाळी मुंडेंच्या सातपुडा बंगल्यात गेल्याचे ‘साम टीव्ही’च्या कॅमेरात कैद झाले आहे.

'साम टीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मुंडेंच्या सातपुड्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची ये-जा सुरू आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून माध्यमांचीही गर्दी झाली आहे. त्यातच सौरभ खराडे हा या बंगल्यात जातानाचे दृश्य कॅमेरात कैद झाले आहे. साम टीव्हीने याबाबत एक्सक्लुझिव्ह वृत्त दिले आहे.

Dhananjay Munde, Saurabh Karad
Dhananjay Munde resignation : मोठी बातमी : राजीनामा का दिला? धनंजय मुंडेंनी सांगितली दोन कारणं...

खराडे या वाल्मिक कराडचा पीए असल्याचे वृत्ता म्हटले आहे. तो मुंडे यांच्या बंगल्यात दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. खराडेच्या माध्यमातून मुंडे अजूनही कराडच्या संपर्कात आहेत का, खराडे मुंडे यांच्या बंगल्यात का आला, दोघांमध्ये काय चर्चा झाली, मुंडे यांनीच खराडेला बोलावले होते का, कराड आणि खराडे अजूनही संपर्कात आहेत का, असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करत राजीनाम्याची दोन कारणे सांगितली आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.

Dhananjay Munde, Saurabh Karad
Santosh Deshmukh Murder : बीड कडकडीत बंद; मुंडे, कराडविरोधात राज्यभर संतापाचा वणवा

माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला असल्याचे मुंडेंनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com