Sunetra Pawar : दत्तामामा भरणे अन् मुश्रीफांकडे अधिवेशन काळातच नवी जबाबदारी : सुनेत्रा पवारांकडूनही एकनाथ शिंदेंचाच निर्णय रिपीट

Politcal News : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे असलेल्या तीन खात्याची जबाबदारी आता इतर दोन मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहे.
Sunetra Pawar Ajit Pawar .jpg
Sunetra Pawar Ajit Pawar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बारामतीजवळील विमान अपघातात महिनाभरापूर्वी अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे सभागृहात त्या काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे असलेल्या तीन खात्याची जबाबदारी आता इतर दोन मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहे.

अजित पवार यांच्याकडे असलेली क्रीडा आणि युवा कल्याण, अल्पसंख्यांक खाते तसेच राज्य उत्पादन शुल्क खाते हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले. तर अर्थखाते हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Sunetra Pawar Ajit Pawar .jpg
Maharashtra BJP: अखेर मुहूर्त मिळाला! रविंद्र चव्हाणांनी जाहीर केली 43 जणांची भाजपची जम्बो कार्यकारिणी; कुणाकुणाला संधी?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या तीनपैकी एकाही खात्याची उत्तरे या अधिवेशनात त्या स्वतः देणार नाहीत. त्यांच्या खात्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याची माहिती आहे. क्रीडा आणि अल्पसंख्याक खात्याची उत्तरे देण्याची जबाबदारी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर राज्य उत्पादन शुल्क खात्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी ही मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Sunetra Pawar Ajit Pawar .jpg
Shivsena UBT News : आधी नगरसेवक होईन, मगच लग्न; उद्धव ठाकरेंचा शिलेदाराला फोन, आता चांगली मुलगी बघ!

दरम्यान, या पूर्वी अधिवेशनकाळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडील तीन खात्याची जबाबदारी शिवसेनेतील उदय सामंत, दादा भुसे किंवा शंभूराज देसाई या तीन मंत्र्यांवर सोपवली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित खात्याची उत्तरे देण्याची जबाबदारी भाजपच्या मंत्र्यावर सोपवली आहे.

Sunetra Pawar Ajit Pawar .jpg
NCP ZP Politics : पश्चिम महाराष्ट्रात हात पाय पसरणाऱ्या भाजपचे नाक राष्ट्रवादीने दाबलं; सातारा, सांगली, कोल्हापूर झेडपीवर घड्याळ येणार?

पार्थ पवार राज्यसभेत जाणार

दरम्यान,अजित पवारांच्या निधनानंतर राज्यसभेत खासदार असलेल्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदीही निवड करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर राज्यसभेत पार्थ पवार यांना पाठवण्यात येणार आहे.

Sunetra Pawar Ajit Pawar .jpg
Pune Congress News: जागा एक इच्छुक अनेक! मुंबई ते दिल्लीपर्यंत नेत्यांचे फोन अन् सेटिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com