Corporators Disqualification : पुणे महापालिकेतील 10 नगरसेवक अपात्र ठरणार? भाजप, राष्ट्रवादी अन् काँग्रेसचे नेते रडारवर!

PMC NCP BJP Congress : पुणे महापालिकेतील तब्बल 10 नगरसेवक अपात्र ठरण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अंतिम सुनावणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
PMC News
PMC News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महानगरपालिकेतून अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींमुळे महापालिकेचे तब्बल १० नवनिर्वाचित नगरसेवक अडचणीत आले आहेत.काही नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामे केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून, आता त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. निवडणूक कार्यालयाने या नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी अंतिम सुनावणीचा प्रस्ताव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सादर केला आहे.

तब्बल चार वर्षांच्या प्रशासक राजवटीनंतर जानेवारी महिन्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीनंतर २४ नगरसेवकांविरोधात लघूवाद न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. मात्र, या व्यतिरिक्त आणखी नऊ ते दहा नगरसेवकांविरोधात अनधिकृत बांधकामप्रकरणी थेट नगरसेवकपद रद्द करण्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती.

शहर अभियंता विभागाने या तक्रारींची चौकशी केली असता, संबंधित नगरसेवकांनी केलेल्या बांधकामांची महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे कोणतीही परवानगी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

PMC News
Himgauri Adke Aher : ...तर थेट निलंबन! नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांचा नगरसेवकांना कडक इशारा, पालिकेचा कारभार सुधरणार?

'हे' १० नगरसेवक रडारवर!

अनधिकृत बांधकामांची तक्रार असलेल्या आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले नगरसेवक हे सर्व पक्षी असल्याचे समोर आले. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे. व्यंकोजी खोपडे, वैशाली बनकर, सुरेखा कवडे, शीतल सावंत, काशिफ फखरूल हसन अली सय्यद, संगीता दांगट, रेखा टिंगरे, स्मिता कोंढरे, प्राची आल्हाट, नंदा आबनावे ही नावे आहेत.

कलम १० (ड) नुसार होणार 'पत्ता कट'?

महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार, पूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्यास पद रद्द होत होते. मात्र, आता सुधारित कायद्यानुसार (कलम १० (ड)), जर संबंधित नगरसेवकाने निवडून येण्यापूर्वी जरी अनधिकृत बांधकाम केले असेल, तरीही त्याचे पद रद्द करण्याची कडक तरतूद आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी आणि नंतर अनधिकृत बांधकाम आढळलेल्या या सर्व १० नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे.

सुनावणीचा पहिला टप्पा पूर्ण

निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ५ नगरसेवकांचे अहवाल अंतिम सुनावणीसाठी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. यातील ४ नगरसेवकांची पहिली सुनावणी प्रक्रिया पार पडली असून, काहींनी पुढील वेळ मागून घेतली आहे. उर्वरित नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकामाबाबत शहर अभियंता कडून अंतिम अहवाल मागवण्यात आला असून, तो येताच पुढील कारवाईची कुऱ्हाड कोसळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

PMC News
Pune-Mumbai Traffic News: पुणे-मुंबई संपर्क तुटला! तिन्ही मार्गांवरील वाहतूक बंद, मावळमध्ये दरड कोसळली, कुटुंब अडकल्याची भीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com