

Pune News : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व जागांवर प्रचंड मताधिक्याने विजय प्राप्त केल्यानंतर आता कारखान्याच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याची आता कार्यक्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे. आगामी काळ सहकारी साखर कारखानदारीसाठी कसोटीचा ठरणार आहे. तसेच, टंचाईचे सावट समोर उभे ठाकल्याने कारखान्याचे नेतृत्व करणाऱ्यांची कसोटी लागणार आहे.
राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे यांच्या नावाची प्राधान्याने चर्चा सुरू असली, तरी नेतृत्वाकडून अनुभवी व्यक्तींना संधी दिली जाते की नव्या चेहऱ्याला याबाबत विविध तर्कवितर्क केले जात आहेत. राजवर्धन शिंदे यांनी या पूर्वी कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे. या दोघांची नावे आघाडीवर असली तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) याठिकाणी सरप्राईज चेहरा देणार असल्याची चर्चा रंगली आहे.
येत्या पंधरवड्यात ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे याबाबत आता विचारविनिमय सुरू झाला आहे. तसेच, पाच वर्षात पाच गटातील संचालकाला उपाध्यक्षपदी संधी दिली जाते, ही कारखान्याची परंपरा आहे. त्यात बदल होणार नाही, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पाच संचालकांना पाच वर्षे उपाध्यक्षपदाची संधी मिळणार, हे निश्चित आहे.
दोन स्वीकृत संचालकांबाबत सभासदांत उत्सुकता
या शिवाय कारखान्यात दोन स्वीकृत संचालकांच्या जागा आहेत. निवडणुकीदरम्यान ज्यांना संधी देता आली नाही व ज्यांनी निवडणुकीत चांगले काम केले, अशा सभासदांची वर्णी या दोन जागांवर लागू शकते, अशी चर्चा आहे. पाच वर्षे दोनच संचालकांना संधी द्यायची की दरवर्षी दोन नवीन सभासदांना स्वीकृतपदी नियुक्त करायचे, या बाबतही श्रेष्ठींकडून काय निर्णय घेतला जातो, याबाबतही सभासदांत उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.