Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना फटकारले, 'सुनेत्रा पवार सक्षम...'

Sunil Tatkare Criticism Dhananjay Munde : मंत्र्यांच्या बैठकीत आमदार बाजूला बसणे ही सामान्य बाब आहे. पण पत्रकार परिषद ही मुख्य व्यक्तीची असते, अशा कानपिचक्या सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडेंना दिल्या.
Sunil Tatkare, dhananjay munde News Beed
Sunil Tatkare, dhananjay munde News Beedsarkarnama
Published on
Updated on

Sunil Tatkare News: बीडच्या पालकमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसने त्यांच्यावर 'गुंगी गुडिया' म्हणून टीका केली. या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत त्यांना बोलू दिले नाही, असा दावा करण्यात येत आहे. मुंडेंनी त्यांना बोलू न देता स्वतः पुढाकार घेतल्याचा आणि पत्रकारांना शांत बसवल्याचा आरोप करण्यात आला.

या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून नाराजी व्यक्त होत असतानाच आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही "बाजूला बसून पत्रकार परिषदेत सहभागी होणे योग्य नाही", असे म्हणत धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या आहेत.

तटकरे म्हणाले, "बीडमधील पत्रकार परिषदेबाबत माझे धनंजय मुंडे यांच्याशी अद्याप बोलणे झालेले नाही. त्यामुळे नेमके काय घडले, याची मला माहिती नाही. मात्र, पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदार बाजूला बसणे ही सामान्य बाब आहे. पण पत्रकार परिषद ही मुख्य व्यक्तीची असते."

"मध्यंतरी चंद्रशेखर बावनकुळे माझ्या जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या पत्रकार परिषदेत मी बाजूला बसलो होतो; मात्र एक शब्दही बोललो नाही. पत्रकार परिषदेत मुख्य व्यक्तीच संवाद साधते. बाजूला बसणे ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेत सहभागी होणे योग्य नाही.", असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

Sunil Tatkare, dhananjay munde News Beed
Rupali Chakankar : सुनेत्रा पवारांसाठी रूपाली चाकणकर मैदानात; काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हणाल्या, "दादांच्या पश्चात..."

सुनेत्रा पवार यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत तटकरे म्हणाले, "सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. त्या प्रसारमाध्यमांसमोर कोणताही विषय समर्थपणे मांडू शकतात, याबाबत पक्षातील सर्व सहकाऱ्यांना विश्वास आहे.

...आता ते जबाबदारीने वागतील

बीडमध्ये नेमकी कोणती पार्श्वभूमी होती, हे समजून घ्यावे लागेल. पण एक संकेत नक्की आहे. पत्रकार परिषद ज्यांच्या नावाने असते, त्यांच्याशीच पत्रकारांचा संवाद व्हायला हवा. इतरांनी त्यात बोलणे अपेक्षित नाही. आमचे सहकारी यापुढे या बाबतीत अधिक जबाबदारीने वागतील.", अशी आशा तटकरे यांनी व्यक्त केली.

Sunil Tatkare, dhananjay munde News Beed
Vaishali Nagawade : सुनेत्रा पवारांनी शोधल्या रुपाली चाकणकरांच्या उत्तराधिकारी : वैशाली नागवडे यांच्याकडे राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com