Pawar-Tatkare Meeting : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुनील तटकरेंना तातडीचा निरोप, सुनेत्रा पवारांसोबत बैठक सुरू, छगन भुजबळही दाखल!

Sunil Tatkare Sunetra Pawar Meeting : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू आहे. या बैठकीला सुनील तटकरे उपस्थित आहेत. त्यांना तातडीचा निरोप देत बैठकीसाठी बोलवल्याची माहिती आहे.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Sunil Tatkare News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निवासस्थान 'देवगिरी' येथे दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे. तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्या भेटीनंतर त्यांना तातडीने बैठकीसाठी बोलावले असल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती सुनेत्रा पवार घेणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित आहेत.

मंगळवारी रात्री सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर बैठक झाली. त्यानंतर आज तटकरे यांना भेटीसाठी तातडीने बोलावल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. त्या संदर्भाती ही भेट असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. जयंत पाटील हे देखील वर्षावर आले होते, असे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. याबाबत जयंत पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मी एकटाच हाॅलमध्ये होते. मुख्यमंत्री आणि माझी अगदी पाच दहा मिनिटे भेट झाली. मी माझे गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. इतर त्यांची कोणासोबत मिटींग सुरू होती याची माहिती मला नाही.

Sunetra Pawar
Jayant Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमागचे गुपित जयंत पाटलांनी सांगितले, 'मी...'

मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. या या संभाव्य विस्तारात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होऊ शकतात. त्याचबरोबर शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या कामगिरीचाही आढावा घेतला जात असून, अकार्यक्षम किंवा वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीमधील वादग्रस्त मंत्र्यांना डिच्चू मिळणार आहे.

Sunetra Pawar
Sachin Ahir Politics : आदित्य ठाकरेंचे टेन्शन वाढले; वरळीच्या मैदानात सचिन अहिर उतरणार! जाहीर सभेत दिला शब्द, '...चमत्कार घडवणार'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com