Nagar Parishad Results : नगपरिषद अन् नगरपंचायतीच्या निकालावर सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय आला, सर्व अंदाज फेल!

Supreme Court Nagar Parishad Nagar Panchayat Results : निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्याच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Supreme Court : नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीमध्ये कोर्टाने ही याचिका निकाली काढत आपला अंतिम निर्णय दिला आहे.

कोर्टाने नागपूर खंडपीठाचे निकाल कायम ठेवताना नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरलाच लागेल यावर शिक्कामोर्तब केले आहे. नागपूर खंडपीठाच्या निकालात सुप्रीम कोर्टाने कुठलाही बदल केला नाही.

सुप्रीम कोर्टाने निर्देश देताना म्हटले की, काही कारणाने 20 डिसेंबरला होणाऱ्या काही नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुक पुढे ढकलल्या गेल्यानंतर दोन डिसेंबरला झालेल्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरलाच जाहीर करावा. तो पुढे ढकलू नये.

Supreme Court
CJI Surya Kant : CJI सूर्य कांत संतापले; तब्बल 16 वर्ष सुरु असलेल्या 'या' खटल्याबद्दल दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

31जानेवारीची मुदत पाळा

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका 31जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश कोर्टाने यापूर्वीच निवडणूक आयोग, राज्य सरकारला दिले होते. आत्ता देखील नागपूर खंडपीठाच्या निकाला विरोधातील याचिका फेटाळली तसेच निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची 31 जानेवारीची मुदत पाळावी, असे देखील सांगितले.

Supreme Court
Maharashtra Teachers Strike : शिक्षक संघटना आक्रमक! वेतन कपातीच्या आदेशानंतरही राज्यातील तब्बल 80 हजार शाळा बंद

सर्व अंदाज फेल...

20 डिसेंबरला काही नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी आणि तसेच 154 सदस्यांसाठी मतदान होणार आहे. मात्र, दोन डिसेंबरला मतदान झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले होती की, सुप्रीम कोर्टात सरकार जाईल आणि त्यामुळे निकाल हा 20 डिसेंबरच्या आधीच लागेल. मात्र, मुश्रीफ यांच्यासह अनेकांचे अंदाज चुकला असून निकाल 21 डिसेंबरलाच लागणार आहे.

Supreme Court
Tapovan Tree Cutting Controversy : 'वृक्षतोड हा धर्माचा विषय नाही, टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला...'; ठाकरेंच्या नेत्याने नितेश राणेंची अक्कलच काढली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com