Maharashtra Teachers Strike : शिक्षक संघटना आक्रमक! वेतन कपातीच्या आदेशानंतरही राज्यातील तब्बल 80 हजार शाळा बंद

School shutdown teachers strike News : राज्यातील सर्वच शिक्षक संघटना एकाच झेंड्याखाली एकवटल्या आहेत. राज्यातील शिक्षक संघटनांनी 5 डिसेंबरला शाळा बंदची हाक दिली होती.
Schools in Maharashtra
Schools in Maharashtrasarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील सर्वच शिक्षक संघटना एकाच झेंड्याखाली एकवटल्या आहेत. राज्यातील शिक्षक संघटनांनी 5 डिसेंबरला शाळा बंदची हाक दिली होती. त्यानुसार शुक्रवारी राज्यातील तब्बल 80 हजार शाळा बंद आहेत. सरकार आणि शिक्षक संघटनांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने राज्यातील शिक्षक काम बंद आंदोलनात सहभागी झाले तर त्यांची रजा विनापगारी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करीत राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षकांनी शाळेत येणे टाळले आहे.

राज्य सरकारकडून याबाबत आदेश काढल्यानंतरही शिक्षक संघटना आंदोलनावर ठाम राहिल्या. या आंदोलनासाठी राज्यभरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, शिक्षकेत्तर संघटना, संस्थाचालक, शिक्षण सेवक आणि मुख्याध्यापक संघटना एकत्र आल्या आहेत. या संपाला विरोधक आणि सत्ताधारी अशा शिक्षक आमदारांनी पाठिंबा दिला आहे. दोन वर्षांत टीईटी पास न झाल्यास शिक्षकांवर टांगती तलवार तर आहेच पण संच मान्यतेचा प्रश्न ही ऐरणीवर आला आहे. यावेळी शिक्षकांनी कोणत्याही दबावाला न जुमानता बंद पुकारला आहे.

Schools in Maharashtra
Beed teachers suspension : बीड जिल्हा परिषदेचे १४ शिक्षक निलंबित; 'या' कारणामुळे केली सीईओने कारवाई

संच मान्यता धोरणानुसार राज्यातील हजारो शाळांमध्ये केवळ एक अथवा दोनच शिक्षक नियुक्त होतील. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल असा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे. बंदमध्ये सहभागी झाल्यास एक दिवसाचे वेतन कपातीचा आदेश माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिला होता. पण शिक्षकांवर (Teacher) त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शिक्षक आंदोलनावर ठाम आहेत. यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. शिक्षक संघटनेचा अचानक बंदचा इशारा आणि त्यानंतर शिक्षण संचालनालयाचा कारवाई आणि वेतन कपातीचा इशारा यामुळे शिक्षक संभ्रमात असल्याचे दिसले.

Schools in Maharashtra
BJP Mission : भाजपकडून मिशन 2029ची तयारी; निवडणुकांमध्ये 'नंबर वन'चा पक्ष ठरण्यासाठी आखली आक्रमक रणनीती

या आहेत शिक्षकाच्या मागण्या :

सुप्रीम कोर्टाने शिक्षकांना टीईटी सक्तीची असल्याचा निर्णय दिला आहे. त्यावर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावीअशी शिक्षकांची मागणी आहे. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळेतील शिक्षकांकडून शुक्रवारी काम बंद आंदोलन केले जात आहे.

Schools in Maharashtra
Shiv Sena UBT: उमेदवारी अर्जासाठी रेट ठरले; ठाकरेसेना पुण्यात किती रक्कम घेणार?

शाळेच्या परिसरात शुकशुकाट

केंद्र सरकारच्या एनसीटीईच्या निकषात बदल करावेत यासह विविध मागण्यासाठी शुक्रवारी कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, जे शिक्षक काम बंद आंदोलनात सहभागी होतील त्यांची रजा विनापगारी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. मात्र, राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी शाळेत येणे टाळले आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी शाळेच्या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Schools in Maharashtra
Nagpur NCP : आता उमेदवारांनी स्ट्रॉंगरुम समोर झोपायचे का? सुरक्षा धोक्यात, पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com