Sanjay Raut 150 Crore Allegation : डिलिमिटेशन बिलासाठी एका खासदाराला 150 कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक दावा; महाराष्ट्रातील बड्या नेत्यावरही आरोप!

Sanjay Raut alleges MPs were offered Rs 150 crore to back the Delimitation Bill. Maharashtra leaders and Winter Session plans in focus : खासदारांच्या कथित खरेदीसाठी महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्याने निधी पुरवण्याची जबाबदारी घेतल्याचा राऊतांचा दावा; शिंदेसेनेभोवती चर्चांना उधाण, हिवाळी अधिवेशन रद्द होण्याच्या शक्यतेने काँग्रेस अलर्ट.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Political Controversy : हिवाळी अधिवेश रद्दची शक्यता वर्तवत थेट अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याची केंद्रातील सत्ताधारी भाजप मोदी सरकार तयारी करत असल्याचे काँग्रेस दावा करत असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी, डिलिमिटेशन बिलाबाबत भाजप करत असलेल्या राजकीय कारवायांवर खळबळजनक दावा केला आहे.

डिलिमिटेशन बिलासाठी भाजपने एका खासदाराची किंमत 150 कोटी रुपये लावली असून, या सर्व पैशाची महाराष्ट्रातील बड्या नेत्यावर जबाबदारी दिल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. खासदार राऊत यांनी हा दावा करताच, राज्यातील भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना चर्चेत आली आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "सरकार हट्टी आणि अहंकारी झाले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन घेतले जात नाही. त्यांना देशाची, संविधानाची किंवा संसदेची कोणतीही चिंता नाही. त्यांच्याकडे डिलिमिटेशन बिलासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळापेक्षा सुमारे 40 ते 45 खासदार कमी आहेत. त्यामुळे छोट्या पक्षांना विकत घेण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू झाले आहे."

Sanjay Raut
Shashikant Shinde : शेतकऱ्यांना 5 हजार, कुंभमेळ्यासाठी 36 हजार कोटी? तीन धरणांतील पाणी नियोजनावर शशिकांत शिंदेंचा सरकारला थेट सवाल!

संपूर्ण पक्ष फोडता आला नाही, तर त्या पक्षांमधील वैयक्तिक खासदारांना विकत घेतले जाईल, असे सांगताना 'भाजप (BJP) नॅशनल स्टॉक एक्स्चेंज'मध्ये एका खासदाराची किंमत 150 कोटी रुपये आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आपल्या पक्षातून बाहेर पडा, तरीही तुमच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही, असे सांगितले जात आहे, असाही दावा खासदार राऊत यांनी केला.

Sanjay Raut
Shankarrao Gadakh on Vikhe Thorat Alliance : विखे-थोरातांच्या एकीने अनेकांच्या अडचणी वाढल्या! शंकरराव गडाख नेमकं कुणाला म्हणाले?

या फोडलेल्या खासदारांना पैसे कसे पोहोचवले जाणार, यावर भाष्य करताना खासदार राऊत यांनी, याची जबाबदारी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने घेतली असून, आवश्यक असलेला सर्व निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे, असाही खळबळजनक दावा केला आहे.

राऊतांचा दाव्यानंतर शिंदे शिवसेनेभोवती चर्चा

खासदार संजय राऊत यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रात डिलिमिटेशन बिलावरून, भाजपची खासदारांना असलेल्या ऑफरवर राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. हा पैसा पुरवणारा महाराष्ट्रातील बडा नेता कोण हा प्रश्न चर्चेत आला असून, त्याची अप्रत्यक्षपणे भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेभोवती चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आगामी काळात ढवळून निघणार, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काँग्रेसचा अंदाज

खासदार राऊत यांनी हा दावा केला असतानाच, काँग्रेस मात्र हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सावध झाली आहे. लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेबाबत घटनादुरूस्ती विधेयकासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात केंद्रातील भाजप मोदी सरकारने संदिग्धता ठेवली असून, हिवाळी अधिवेशन रद्दची शक्यता काँग्रेसने वर्तवली आहे. केंद्रातील भाजप मोदी सरकार थेट अर्थसंकल्पीय अधिवेशन घेईल, असा अंदाज काँग्रेस व्यक्त केला आहे. काँग्रेसने अधिकच सावधानता बाळगून खासदारांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.