Ajit Pawar Politics : अजितदादांचा अजब न्याय, मारहाणप्रकरणी निलंबित केलेल्या सूरज चव्हाणला प्रमोशन, अंजली दमानिया संतापल्या!

Suraj Chavan Ajit Pawar njali Damania : अजित पवार यांनी मारहाण प्रकरणात सूरज चव्हाण याचे निलंबन केले होते. मात्र, निलंबनाला तीन आठवडे होण्याच्या आधीच चव्हाण याच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.
Suraj chavhan, ajit pawar, Anjali Damania
Suraj chavhan, ajit pawar, Anjali DamaniaSarkarnama
Published on
Updated on

Suraj Chavan News : खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी पत्ते फेकले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि काही कार्यकर्त्यांनी मिळून विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली. घाडगे यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्यात येत होती. या मारहाणीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरज चव्हाण याला पक्षातून निलंबित केले होते.

21 जुलैला अजित पवारांनी सूरज चव्हाण यांचे निलंबन केले. मात्र, या निलंबनाला तीन आठवडे होण्याच्या आधीच सूरज चव्हाणचे यांचे थेट प्रमोशन करत त्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. सुनिल तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

चव्हाण यांना निलंबित केल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकत सरचिटणीस केल्यानंतर अजित पवार यांच्यावर टीका होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या नियुक्तीवरून संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात? छान!

Suraj chavhan, ajit pawar, Anjali Damania
BJP Politics : पृथ्वीराज पाटील एकटेच गेले नाहीत... उरलसी सुरली काँग्रेसच मोकळी केली, दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

दिसला का जन सन्मान ?

छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिले. आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. हेच का महाराष्ट्राचे गूड गव्हर्नस. कमालीची बाब म्हणजे, अगदी दोन आठवड्या पूर्वी, मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात ह्याच राष्ट्रवादी पक्षानेसूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नाहीत, ते कार्यालय येत नाहीत असे कोर्टाला लिहून दिले आहे.मग असे अचानक काय झाले? काही महिन्यांपूर्वी ह्याच पक्षाने ‘जन सन्मान यात्रा ‘ काढली होती. दिसला का ह्यांचा जन सन्मान ? असा प्रश्न करत चव्हाण यांच्या नियुक्तीवरून दमानिया यांनी टोला लगावला आहे.

Suraj chavhan, ajit pawar, Anjali Damania
Eknath Shinde: महायुतीत एकनाथ शिंदेंची वाढती कोंडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com