Sushma Andhare Vs Chitra Wagh : सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांना करारा जबाब; म्हणाल्या, 'माझ्याकडे वाचवायला...'

Sushma Andhare Criticized Chitra Wagh :उन्मादी वक्तव्य आणि तोच आक्रस्ताळेपणा पुन्हा पुन्हा सुरू आहे. बाई, पाठीशी असणाऱ्या महाशक्तीच्या जोरावरची ही धमक्यांची भाषा तुमच्याजवळ ठेवा, असा इशारा सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना दिला.
Sushma Andhare Chitra Wagh
Sushma Andhare Chitra Waghsarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : चित्रा वाघ यांनी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. माझ्यावर टीका केली. माझ्या कॅरेक्टवर प्रश्न केला. अजून किती वर्ष प्रश्न विचारणार. माझ्या कॅरेक्टरला धरून बोललं जातं. तुमची लायकी काय? असे चित्रा वाघ म्हणाल्या. त्यांच्या या टीकेला अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सोशल मीडियावर सुषमा अंधारे पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, 'कालपासून समाज माध्यमांवर सर्व स्तरातील लोकांनी योग्यता दाखवल्यानंतरही वाघ बाईंचा थयथयाट काही थांबायचं नाव घेत नाही. उन्मादी वक्तव्य आणि तोच आक्रस्ताळेपणा पुन्हा पुन्हा सुरू आहे. बाई, पाठीशी असणाऱ्या महाशक्तीच्या जोरावरची ही धमक्यांची भाषा तुमच्याजवळ ठेवा.'

Sushma Andhare Chitra Wagh
Solapur Bazar Samiti : मोहन निंबाळकरांना हायकोर्टाचा दणका; बारा दिवसांत फेरनियुक्तीवर आलेल्या प्रशासकाची 24 तासांत पुन्हा उचलबांगडी!

'अत्यंत इमानी इतबारे माणूसपणाच्या मूल्यासाठी लढा देणाऱ्या चळवळीतून मी आले आहे. पायाच्या दोन बोटात दगड पकडून मागच्या मागे दगड भिरकाऊन जागीच शिकार करणाऱ्या आदिवासी पाड्यावरची आहे मी. माझ्याकडे वाचवायला लाचखोरीतून जमा केलेला पैसा नाही. मुंबईसारख्या शहरात वाममार्गाने जमा केलेली प्रॉपर्टी नाही.', असा टोला देखील अंधारेंनी चित्रा वाघांना लगावला आहे.

माझ्याशी नीट वागायचं...

'माझ्याकडे प्रचंड जपायला माझं ईमान, शील आणि सत्व आहे. त्याच्यावर बोलणेच काय या शब्दांचा अर्थ कळण्याची ही तुमची योग्यता नाही.', असे देखील सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना उद्देशून म्हटले आहे. तसेच आपल्या फेसबूक पोस्टमध्ये माझ्याशी नीट वागायचं, असा हॅशटॅग देत चित्रा वाघांना इशारा दिला आहे.

विचित्रपणे किंचाळत होती...

सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेमध्ये अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्या झालेल्या खडाजंगी नंतर गुरुवारी (ता.20) फेसबूक पोस्ट करत म्हटले होते की, 'कालपासून वाघबाई बद्दल बोलताना काहीजण झोपडपट्टीतील भाषा, झोपडपट्टीत बोलल्यासारखे असे शब्द वापरत आहेत. पण हा झोपडपट्टीतील गरीब, प्रामाणिक लोकांचा अपमान आहे. कृपया हे समजून घ्या. झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो. झोपडपट्टी ही प्रचंड काबाडकष्ट करून खाणाऱ्यांची वस्ती आहे.'

Sushma Andhare Chitra Wagh
Solapur Bazar Samiti : मोहन निंबाळकरांना हायकोर्टाचा दणका; बारा दिवसांत फेरनियुक्तीवर आलेल्या प्रशासकाची 24 तासांत पुन्हा उचलबांगडी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com