Sushma Andhare Vs Ajit Pawar: अजित पवारांनी खडसावल्यानंतर अंधारे म्हणाल्या, ''दादा, तुम्ही आमच्या हक्काचे, असं बोलून...''

Maharashtra Politics: सुषमा अंधारेंनी पवारांसमोर रडण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचे नेते उध्दव ठाकरेंसमोर रडायला हवं होतं असं म्हटलं होतं.
Sushma Andhare Vs Ajit Pawar
Sushma Andhare Vs Ajit PawarSarkarnama

Sushma Andhare News : सातारा येथील एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर रडल्या होत्या. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अंधारेंवर खडसावलं होतं. यावेळी त्यांनी अंधारेंनी पवारांसमोर रडण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचे नेते उध्दव ठाकरेंसमोर रडायला हवं होतं असं म्हटलं होतं. आता अंधारेंनी अजितदादांच्या टीकेवर पलटवार केला आहे.

सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अंधारे म्हणाल्या, मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की, माझं गाऱ्हाणं हे सर्वपक्षीय नेतेमंडळीसाठी आहे. पण तुम्ही आमच्या हक्काचे आहात. तुमच्याशी आम्ही आपुलकीने बोलतो. महाविकास आघाडीतला एक ज्येष्ठ नेता म्हणून बोलतो. पण असं म्हणून तुम्ही आम्हांला अजिबात पारखं करु नये की, हे आमच्याच जवळ का बोलता. कारण दादा आमचे हक्काचे आहेत असंही त्या म्हणाल्या.

Sushma Andhare Vs Ajit Pawar
Supreme Court Decision : राज्यपालांची भूमिका घृणास्पद ; ठाकरेंनी कोश्यारींनी फटकारलं, म्हणाले, 'घरगड्याप्रमाणे काम..

अजित पवारांचा मी उल्लेखच केलेला नाही, पण...

तसेच अजित पवारां(Ajit Pawar)नी दिलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या संदर्भावर बोलताना अंधारे म्हणाल्या, मी कोणत्याही सभागृहाची सदस्य नसल्यामुळे तिथं मी हा मुद्दा उपस्थित करु शकत नाही. म्हणून माझी खंत बाहेर बोलून दाखवली. आणि ती फक्त अजित पवारांसाठी नाहीतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंपासून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अशा सर्वांसाठी होती. यावेळी त्यांनी सातारा येथील कार्यक्रमात अजित पवारांचा उल्लेखच केलेला नव्हता असा खुलासाही अंधारेंनी यावेळी केला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते ?

अजित पवार यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा चांगलाच खरपूस समाचार घेतला होता.यावेळी अजित पवार म्हणाले,कुठल्या पक्षाच्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या ना. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत ना. मग साताऱ्यात शरद पवारांसमोर भावनिक होण्यापेक्षा ते रडण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघताहेत, ज्या पक्षासाठी बाबा रे, दादा रे काका रे,मामा रे करत सभा घेताहेत. त्यांनी अजित पवारांचं नाव घेण्यापेक्षा त्या ज्या पक्षात आहेत. त्याच्या विरोधीपक्षाच्या नेत्यांना सांगायला हवं होतं ना असा सवाल पवारांनी उपस्थित केला.

Sushma Andhare Vs Ajit Pawar
Raj Thackeray on Supreme Court: न्यायालयाच्या निकालावर राज ठाकरे म्हणाले, आधीच्या मुख्यमंत्र्यानी...

विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या इतकाच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यालाही अधिकार असतात. त्यामुळे तिकडं उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray)समोर रडला असता आणि त्यांच्या विरोधीपक्षनेते असलेल्या अंबादास दानवेंना सभागृहात हा मुद्दा मांडायला सांगितला असता ते जास्त योग्य ठरलं असतं असा टोलाही अजित पवारांनी सुषमा अंधारेंना लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com