Uddhav Thackeray on Supreme Court Decision Governor Koshyari : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दिलेल्या निकालावर भाष्य केलं. माजी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढले आहेत. उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली.
यावेळी ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंत उपस्थित होते. यावेळी ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, "राज्यपालांची भूमिका घृणास्पद आहे. त्यामुळे राज्यपाल निवडीसाठी योग्य यंत्रणा असायला पाहिजे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. पण कोश्यारींनी या पदाचा वापर घटनाबाहेर केला. राज्यपालांनी घरगड्याप्रमाणे काम करु नये,"
"राज्यपाल जर घरगड्याप्रमाणे काम करीत असतील, तर राज्यपाल ही संस्थाच बरखास्त करायला पाहिजे.या पदाला नियम असतात. त्यामुळे त्यांची निवड करताना केंद्र सरकारची यंत्रणा असावी," असे ठाकरे म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी विनंती केली, ते म्हणाले, "महाराष्ट्राची बदनामी तातडीने थांबवावी. लवकरच निवडणुका घ्याव्यात, डबल इंजिनमधलं पोकळ इंजिन आता बाजूला टाकलं पाहिजे,"
आम्ही कोर्टात जाऊ..
उद्धव ठाकरे म्हणाले, "सोळा आमदार अपात्र झाल्यानंतर ४० जणांची मते वजा केली तर अध्यक्षही बेकायदेशीर ठरतील. आमदार अपात्रतेच्या सुनावणीला विलंब लावू नये, अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतला तर आम्ही कोर्टात जाऊ,"
मेलेला पोपट हातात घेऊन मिठुमिठु करत आहेत..
"मी राजीनामा दिला नसता तर मला पुन्हा मुख्यमंत्री होता आले असते, असे निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. मात्र मला यात स्वारस्य नाही. नैतिकतेला जागून मी राजीनामा दिला. सध्याचं सरकार बेकायदेशीर आहे त्यांनी देखील आता राजीनामा द्यावा. काही जण मेलेला पोपट हातात घेऊन मिठुमिठु करत आहेत. अध्यक्ष त्यांच्या परिने निर्णय घेतीलच. ते सध्या परदेशात आहेत. लवकरात लवकर येऊन त्यांनी निकाल लावावा," असे ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.