Talathi Bharti 2026 : मोठी बातमी! 1700 जागांची तलाठी भरती, एमपीएससी घेणार परीक्षा, प्रशासकडून तयारी सुरू

Talathi Bharti MPSC Exam : एमपीएससी मार्फत 1700 जागांची तलाठी भरती होणार आहे. 8 मेपर्यंत मागणीपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Talathi Bharti 2026
Talathi Bharti 2026 sarkarnama
Published on
Updated on

Talathi Bharti News : विद्यार्थी प्रतीक्षीते असलेल्या तलाठी भरतीबाबत सरकारने गुड न्यूज दिली आहे. तब्बल 1700 जागांची तलाठी भरती होणार आहे. प्रशासनाने सर्व विभागीय आयुक्तांना 8 मेपर्यंत मागणीपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ही परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारने सरळ सेवा भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. सरळसेवेची पदे ही आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. पारदर्शकतेसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सरळसेवेमधील तब्बल 46 पदे ही एमपीएससीमार्फत भरली जाणार आहेत. फक्त शिक्षक आणि पोलिस भरतीच याला अपवाद ठरणार आहे. दरम्यान, सरळसेवा भरतीविषयीचा जीआर सरकारने पाच मे रोजी प्रसिद्ध केला आहे. तसेच गट ब, गट क आणि गट ड परीक्षांसाठी घेतली जाणारी मुलाखत देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Talathi Bharti 2026
Maharashtra News Live Update: राज्य सरकारचा 'आयएलएस' महाविद्यालयाला दणका, विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क व्याजासह परत करण्याचे निर्देश

गट ब पूर्व परीक्षा

एसटीआय, एएसओ आणि पीएसआय या पदांसाठी एमपीएससीमार्फत पूर्व परीक्षा 14 जूनला घेण्यात येणार आहे. 552 जागांसाठी परीक्षा घेतली जाणार असून 14 मे पर्यंतयासाठी अर्ज करता येणार आहेत.

Talathi Bharti 2026
TRTI Success:टीआरटीआयचे 82 विद्यार्थी झाले पोलीस; 4 विद्यार्थ्यांची नागरी सेवेसाठी निवड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com