TRTI Success:टीआरटीआयचे 82 विद्यार्थी झाले पोलीस; 4 विद्यार्थ्यांची नागरी सेवेसाठी निवड

TRTI students police selection: टीआरटीआयच्या प्रशिक्षण, मार्गदर्शन व निर्वाह भत्त्यामुळे आदिवासी व इतर वंचित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत मोठी संधी; पहिल्याच वर्षी पोलिस भरतीसह नागरी सेवेतही उल्लेखनीय यश
Police Recruitment
Police RecruitmentSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: राज्यातील दहा जिल्ह्यात पोलीस भरतीच्या निकालात टीआरटीआयच्या ८२ विद्यार्थ्यांना यश मिळाल्याची माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने दिली आहे.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, मार्फत नागरी सेवा परीक्षा तसेच महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा, अराजपत्रित गट क, पोलीस व इतर भरती प्रक्रियेसाठी प्रशिक्षण घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेत यश आले आहे.

टीआरटीआय संस्थेचा लाभ घेतलेले चार विद्यार्थ्यांची नागरी सेवेतून निवड झाली आहे. यासाठी राज्य शासनामार्फत २५० कोटींची तरतुदी ही करण्यात येत असते.

Police Recruitment
Maval News: मावळात राजकीय उलथापालथ; राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांचे राजीनामे; भाजपच्या आनंदोत्सवावर पाणी, बाजार समिती बरखास्त होणार?

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत ‘या’ संस्थेमार्फत दिले जाणारे प्रशिक्षण, अभ्यास साहित्य, मार्गदर्शन आणि विद्यावेतनाचे पाठबळ विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी निर्माण करते. 

धनंजय राऊत ( उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत)

Police Recruitment
Maharashtra Cabinet Decisions: सरकारी विभागात IT कॅडर; मंत्रालयात स्वतंत्र AI विभाग, मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 5 निर्णय

ही मुले प्रवाहापासून वंचित आहेत . या योजनेचे हे पहिले वर्ष असून विद्यार्थ्यांना संस्था निवडीचा पर्यायही दिला जातो. सर्व प्रक्रिया ऑनलाइन द्वारे पारदर्शक राबवल्याने विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो. व पुढील काही वर्षात आणखी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना यश आलेले दिसेल.

चंचल पाटील ( टीआरटीआय सहसंचालक )

राज्यभरात ३०,००० हजार विद्यार्थी टीआरटीआय मार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणांचा लाभ घेतात . यामध्ये यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट डीबीटी द्वारे एक वर्षासाठी प्रत्येक महिन्याला निर्वाह भत्ता म्हणून १३ हजार दिले जातात तसेच एमपीसी साठी १० हजार व पोलीस भरतीसाठी १० हजार प्रशिक्षणाच्या खर्चा व्यतिरिक्त निर्वाह भत्ता म्हणून दिला जातो. यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला दिसून येतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Tribal Students Meet Chief Minister Devendra Fadnavis
Justice RC Chavan Resignation UCC committee
Adivasi Vikam Mantri Ashok
Rahul Gandhi letter to Devendra Fadnavis.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com