Talegaon–Chakan Highway : मोठी बातमी! तळेगाव-चाकण महामार्गाला मंजुरी; 'चाकणकरां'ची वाहतूक कोंडीतून होणार सुटका!

Chakan Four-Lane Highway Approval CM Devendra Fadnavis: पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण क्रमांक ५४८ डी राष्ट्रीय महामार्गावरील ० ते २६ किलोमीटर दरम्यान ४ पदरी उन्नत महामार्ग सुधारणेस मंजुरी देण्यात आली आहे.
Talegaon-Chakan Four Lane Highway Approved
Talegaon-Chakan Four Lane Highway Approvedsarkarnama
Published on
Updated on

Chakan traffic problem solution road project: तळेगाव चाकण मार्गावर मोठ्या वाहतूक कोंडींचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. औद्योगिक प्रकल्प या परिसरात असल्याने या परिसरात वाहनांची रेलचेल असते. मात्र, या मार्गावर होणाऱ्या कोंडीमुळे चाकणमधील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. आता या सर्वांची कोंडीतून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील पायाभूत प्रकल्पांच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झाली. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण क्रमांक ५४८ डी राष्ट्रीय महामार्गावरील ० ते २६ किलोमीटर दरम्यान ४ पदरी उन्नत आणि ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गासह याच महामार्गावर चाकण ते शिक्रापूर दरम्यान पुढे २६ ते ४३ किलोमीटर लांबीमध्ये ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गाची डीएफबीओटी (डिझाईन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट ॲन्ड ट्रान्सफर) पद्धतीने सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

या महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार व विहित कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे येथे निश्चितच औद्योगिक विकासास मदत होणार आहे. पुणे शहर परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महामार्गाची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासाठी महामार्गाचे जाळे विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित आदी उपस्थित होते. बैठकीत सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी केले. बैठकीस सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com