TET Scam Mastermind : TET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! मुख्य आरोपीच्या पत्नीला पाटण्यातून अटक; पसार आरोपींवर 'LOC'ची तयारी

Main accused wife arrested in TET scam case: टीईटी पेपरफुटीच्या तपासासाठी ठाणे पोलिसांची 9 विशेष पथके सक्रिय असून, पसार आरोपी देशाबाहेर पलायन रोखण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत.
LOC against absconding accused in TET scam
LOC against absconding accused in TET scamSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra TET Scam : राज्यात गाजत असलेल्या TET पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत फरार मुख्य आरोपी बलिंदर कुमार साहा ऊर्फ बिजेंद्र कुमार गुप्ता याच्या पत्नी सुमनकुमारी गुप्ता हिला बिहारमधील पाटणा येथून अटक केली आहे. न्यायालयाने तिला 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील तपासाला आता नवे वळण मिळाले आहे.

या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या ठाणे पोलिसांनी संपूर्ण नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी तब्बल 9 विशेष पथके तयार केली आहेत. यातील एक पथक पाटणा येथे कारवाईसाठी रवाना झाले होते, तर दुसरे पथकही बिहारमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित पथके महाराष्ट्रासह (Maharashtra) इतर राज्यांमध्ये पेपरफुटी रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तपास करत आहेत.

तपासादरम्यान पोलिसांनी (Police) मुख्य सूत्रधार बलिंदर कुमार साहा ऊर्फ बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमनकुमारी हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने पतीच्या आर्थिक व्यवहार आणि हालचालींबाबत विसंगत माहिती दिल्याने पोलिसांनी तिला तत्काळ अटक केली. त्यानंतर तिला भिवंडी येथील एस. एम. सुतार न्यायालयात हजर करण्यात आले.

LOC against absconding accused in TET scam
Maharashtra TET Paper Leak : हरियाना-बिहारच्या टोळीने फोडला महाराष्ट्राचा 'TET'चा पेपर, SIT चौकशी सुरू

सरकारी वकील सुमित जाधव यांनी न्यायालयात सांगितले की, या संपूर्ण गैरव्यवहारात सुमनकुमारीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचा तपास करणे अत्यावश्यक आहे. तसेच मुख्य आरोपी बलिंदर कुमार साहा याच्याविरोधात ओडिशामध्ये 2023 मध्ये याच प्रकारच्या पेपरफुटीशी संबंधित दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहितीही न्यायालयासमोर मांडण्यात आली.

LOC against absconding accused in TET scam
TET Exam Police Action : परीक्षेच्या आधीच TET पेपर फुटला? भिवंडीत पोलिसांची गुप्त कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

सुमनकुमारी गुप्ता हिची कोठडीत रवानगी

मात्र बचाव पक्षाने सुमनकुमारीचा या व्यवहारांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सुमनकुमारी गुप्ता हिला 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

‘लूक आऊट सर्क्युलर’ची तयारी

दरम्यान या प्रकरणातील फरार आरोपी कपिल धैया आणि बलिंदर कुमार साहा हे देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी त्यांच्या विरोधात ‘लूक आऊट सर्क्युलर’ (LOC) जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

देशभरात टोळी सक्रिय

तपास यंत्रणांच्या मते, हे प्रकरण केवळ एका टोळीपुरते मर्यादित नसून देशभरात अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका लीक करणाऱ्या आणखी काही संघटित टोळ्या सक्रिय असू शकतात. TET पेपर नेमका कुठून लीक झाला, या संपूर्ण रॅकेटमागचा खरा मास्टरमाइंड कोण आहे आणि शिक्षण व्यवस्थेला हादरा देणाऱ्या या घोटाळ्याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचे उत्तर मुख्य आरोपींच्या अटकेनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, राज्यातील शिक्षण क्षेत्र हादरवणाऱ्या या घोटाळ्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com