

Profile of Kolhapur's new Mayor Ruparani Nikam: कोल्हापूरच्या महापौरपदासाठी भाजपकडून रुपाराणी निकम यांना संधी देण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निकम यांच्या नावाची घोषणा केली. तर उपमाहापौरपदासाठी जनसुराज्य पक्षाच्या अक्षय जरग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज (सोमवारी) दुपारी या दोन्ही पदासाठी महायु्तीकडून अर्ज दाखल केले जाणार आहे. निकम यांना सव्वा वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, गटनेते मुरलीधर जाधव यांच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. येत्या 6 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेची विशेष सभा जिल्हाधिकारी आणि अमोल येडगे यांनी आमंत्रित केली आहे. यात निकम यांची अधिकृत निवड होणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत सुरुवातीची सव्वा वर्षे भाजपचा महापौर होईल हे निश्चित झाल्यानंतर भाजप अंतर्गत इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली होती. महापौरपदासाठी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पडल्यानंतर प्रमोद देसाई, विजयसिंह देसाई, वैभव कुंभार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र सर्वसाधारण गटातून जागा लढवलेल्या रूपाराणी निकम, विजयसिंह खाडे पाटील यांचीही नावे समोर आली.
19 जानेवारी रोजी आरक्षण निश्चित झाल्यानंतर तब्बल 14 दिवसानंतर भाजपच्या शिष्टमंडळाकडून रुपाराणी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपला कोणी खुंटीवर देखील टांगायला तयार नव्हते. पण आता दिवस बदलले भाजप एक ब्रँड झाला आहे. स्थायी समितीचे सभापती पदही भाजपच घेणार आहे.
काँग्रेसच्या बड्या उमेदवाराचा केलाय पराभव :
गत महानगरपालिका निवडणुकीत रूपाराणी निकम या कोल्हापूर महानगरपालिकेत राजेंद्रनगर परिसरातून निवडून आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसचे उमेदवार भूपाल शेटे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मागील 20 ते 25 वर्षांपासून भूपाल शेटे हे प्रभागाचे नेतृत्व करत होते. त्यांचा पराभव करून निकम या भाजपकडून विजयी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.