Lok Sabha Exit Poll 2024 : 'एक्झिट पोल' गुवाहाटीमध्ये कापलेल्या रेड्यासारखे, ठाकरे गटाचा निशाणा

Shivsena Uddhav Thackeray Group Mocks exit poll results : 4 जूनला मतमोजणी होईल व हुकूमशाहीचा अंधकार दूर होईल. मोदींनी ध्यान केले व सूर्याला शांत केले, असे भाजपवाले सांगतात. असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Narendra Modi, Uddhav Thackeray
Narendra Modi, Uddhav ThackeraySarkarnama

Exit Poll 2024 : लोकसभेच्या निकालासाठी अवघा 1 दिवस शिल्लक राहिला आहे. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार भाजपप्रणीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे. तर काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीत 150 जागा पार करत असल्याचा अंदाज आहे. इंडिया आघाडी सत्तेत येत नाही, हे अंदाज वर्तवले असल्याने 'सामना'तून थेट एक्झिट पोलच Exit Poll खोटे ठरवले आहेत. 'एक्झिट पोल' गुवाहाटीमध्ये कापलेल्या रेड्यासारखे आहेत. त्यामुळे खरे निकाल बदलणार नाहीत, असा हल्ला ठाकरे Uddhav Thackeray गटाचे मुखपत्र 'सामना'तून चढवण्यात आला आहे.

'4 जूनला मतमोजणी होईल व हुकूमशाहीचा अंधकार दूर होईल. मोदींनी Narendra Modi ध्यान केले व सूर्याला शांत केले असे भाजपवाले सांगतात. मोदी यांनी ध्यान केले तरी जनतेच्या मनात उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाहीत व त्यामुळे भाजपचा पराभव होणारच आहे.', असा दावा करत भाजप 225 जागांच्या पुढे जात नाही व इंडिया आघाडी 295 ते 310 जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असे ठाकरे गटाने Thackeray Group ठणकावले आहे.

एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्या सारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही. मोदी है तो इंडिया आघाडीचा विजय शंभर टक्के मुमकीन है! मोदी जात आहेत हाच 4 जूनचा खरा निकाल आहे, असे देखील ठाकरे गटाने म्हटले आहे.

Narendra Modi, Uddhav Thackeray
Lok Sabha Election 2024 : पंकजाताई, कोल्हे, लंके, शशिकांत शिंदेंची धडधड वाढली; एक्झिट पोलचे अंदाज उलटे फिरणार?

एक्झिट पोलवर प्रश्नचिन्ह

उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगालसारख्या मोठ्या राज्यांच्या मतदानासंदर्भात संपूर्ण ‘डाटा’ बाहेर आलेला नाही. त्यामुळे या राज्यांत काय निकाल लागतील, त्याचे भविष्य कोणीच सांगू शकत नाही, पण या सगळय़ा राज्यांतील मतदानाची सारासार माहिती न घेता ‘एक्झिट पोल’वाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी बिनधास्त ठोकून दिले की, पुन्हा एकदा मोदीच येत आहेत व भाजपला आणि त्यांच्या आघाडीस 350 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत, असे म्हणत एक्झिट पोलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

एक्झिट पोलचे अंदाज चुकले

विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल, असा एक्झिट पोलचा अंदाज होता. तसे घडले नाही. तर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला बंपर आकडा मिळेल, असे अमित शाह यांनी जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात ममतांनी बंपर विजय मिळवला. एक्झिट पोलची ही अवस्था. त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज चुकत असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

Narendra Modi, Uddhav Thackeray
Nashik Teachers Constituency 2024 : शिक्षक मतदारसंघात रंगणार विखे विरुद्ध कोल्हे संघर्षाचा दुसरा अंक!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com