Nashik Teachers Constituency 2024 : शिक्षक मतदारसंघात रंगणार विखे विरुद्ध कोल्हे संघर्षाचा दुसरा अंक!

Vikhe Kolhe Vs Rajendra Vikhe Nashik Teachers Constituency Election Update : नगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये विखे विरुद्ध कोल्हे हा राजकीय संघर्ष बहुचर्चित आहे.
Vikhe Kolhe Vs Rajendra Vikhe
Vikhe Kolhe Vs Rajendra VikheSarkarnama
Published on
Updated on

Vikhe Kolhe News : विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघात आता अनेक प्रबळ शिक्षण संस्थाचालकांनी बाह्या सरसावल्या आहेत. नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघात आज (सोमवारी) मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

आज प्रवरा एज्युकेशन ट्रस्टचे प्रमुख डॉ. राजेंद्र विखे पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विखे पाटील यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात अतिशय तीव्र राजकीय लढाई होण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यातील ताज्या राजकीय घडामोडींमध्ये विखे विरुद्ध कोल्हे Vikhe Kolhe हा राजकीय संघर्ष बहुचर्चित आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांचा 17 विरुद्ध 1 असा पराभव केला होता. या राजकीय संघर्षातील दुसरा अंक डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी उमेदवारी केल्यास शिक्षक मतदार संघात दिसून येईल.

या निवडणुकीत संजीवनी शिक्षण संस्थेचे प्रमुख विवेक कोल्हे यांनी उमेदवारी केली आहे. त्यांच्या विरोधात विखे पाटील Rajendra Vikhe Patil यांनी उमेदवारी केल्यास नगर जिल्ह्यातील पारंपारिक राजकीय संघर्ष दिसून येईल. हे दोघेही भाजपचे नेते आहेत.

मात्र हा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात एकनाथ शिंदे गटाला देण्यात आला आहे. अशा स्थितीत उमेदवारी कोणाला आणि मुख्य लढत कोणामध्ये होणार याची उत्सुकता वाढत आहे.

Vikhe Kolhe Vs Rajendra Vikhe
Nashik Teacher Constituency : 'तालीम' सुधीर तांबेंची, आमदारकीसाठी 'डाव' टाकलाय विवेक कोल्हेंनी!

या मतदारसंघात शिवसेनेच्या उपनेते शुभांगी पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले आहे. नुकतेच काँग्रेस मधून शिवसेनेत आलेले संदीप गुळवे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील.

विद्यमान आमदार किशोर दराडे यांनीही निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. अशा स्थितीत अनेक प्रबळ उमेदवार उभे राहिल्याने शिक्षक मतदार संघातही राजकीय नेत्यांची चुरस असेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

(Edited By Roshan More)

Vikhe Kolhe Vs Rajendra Vikhe
Bhanudas Murkute On Radhakrishna Vikhe : भानुदास मुरकुटे संतापून म्हणाले, 'मंत्री विखेंचा कारभार 'मोहम्मद तुघलकी' तर, आमदार कानडे 'बेजबाबदार'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com