Shivsena UBT : 'खडसेंना मंत्रिपद फडणवीसांच्या कपटी राजकारणाला चपराक', ठाकरे गटाची बोचरी टीका

Uddhav Thackeray group criticizes Devendra Fadnavis Over Raksha Khadse Taking oath as Minister in Modi 3.0 Cabinet : फडणवीस, महाजन यांना चपराक देण्यासाठी विनोद तावडे यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे देखील ठाकरे गटाने म्हटले आहे.
uddhav thackeray devendra fadnavis
uddhav thackeray devendra fadnavissarkarnama

Shivsena UBT : लोकसभा मंत्रिमंडळात रक्षा खडसे यांना स्थान मिळाले. त्यांनी मंत्रि‍पदाची शपथ देखील घेतली. 'खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश हा महाराष्ट्रातील फडणवीस, गिरीश महाजन यांच्या कपटी राजकारणास दिल्लीने दिलेली चपराक आहे', अशी जळजळीत टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र 'सामना'तून करण्यात आली आहे.

फडणवीस, महाजन यांना चपराक देण्यासाठी विनोद तावडे यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे देखील ठाकरे Uddhav Thackeray Group गटाने म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात आम्ही ठरवू तेच मंत्री होतील असे फडणवीस वगैरे लोकांना वाटत होते. ते या वेळी घडले नाही. नारायण राणे, भागवत कऱ्हाड यांना मंत्रिमंडळातून नारळ दिला आहे, अशी टीका करत ठाकरे गटाने फडणवीसांना डिवचले आहे.

इंडिया आघाडीने मोदींच्या शपथविधी समारंभावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे संसदीय परंपरा, संकेतांचा भंग केल्याची टीका इंडिया आघाडीवर होत आहे. मात्र, ठाकरे गटाकडून इंडिया आघाडीचे समर्थन करण्यात आले आहे. मोदी पंतप्रधान असताना विरोधी पक्षांचे 150 खासदार निलंबित करून रिकाम्या बाकांसमोर भाषणे ठोकण्याचा पराक्रम मोदी यांनी केला. संसदीय लोकशाहीचे कोणते संकेत मोदी किंवा त्यांच्या लोकांनी पाळले? असा प्रतिप्रश्न ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

uddhav thackeray devendra fadnavis
Loksabha Election Result 2024 : विधानसभेला महाविकास आघाडी 164 जागा जिंकणार? लोकसभेच्या निकालाने महायुती चिंतेत

मोदी निवडणूक हरले

भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. एनडीएतील सहकाऱ्यांच्या सोबत त्यांनी सत्तास्थापन केली. त्यावरून मोदी निवडणूक हरले, असल्याची टीका ठाकरे गटाने केली. एनडीएच्या बैठकीत काँग्रेस, इंडिया आघाडीवर मोदींनी टीका केली होती. त्या टीकेचा समाचार देखील ठाकरे गटाने घेतला. 'जो माणूस स्वतः निवडणूक हरला आहे. वाराणसी मतदारसंघात कसाबसा विजय मिळाला. बहुमत गमावले तरी स्वतःचे झाकून दुसऱ्यांचे वाकून पाहण्याची त्यांची खोड काही जात नाही', असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com