Vinayak Raut Vs Narayan Rane : '...यांची औकात नरेंद्र मोदींनी ओळखली म्हणून मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही' ; राऊतांचं राणेंवर टीकास्त्र!

Vinayak Raut on Narayan Rane : पैशाच्या मस्तीवर या मतदार संघात फक्त 48 हजार मतांनी विजय मिळविला तर त्यांचे हात स्वर्गाला टेकले असं समजू नये.
Vinayak Raut Vs Narayan Rane
Vinayak Raut Vs Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Vinayak Raut criticizes Narayan Rane : भाजप नेते आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी कोकणातून शिवसेना(उद्धव ठाकरेंची) संपली आहे, असं वक्तव्य केलं. ज्यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी जोरदार पलटवार केला.

शिवाय, नाराणयण राणेंना यंदा केंद्रीय मंत्रिमंडळात मोदींनी का डावललं याबाबतही विनायक राऊतांनी मोठं विधान केलं आहे.

'शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे. पैशाच्या मस्तीवर या मतदार संघात फक्त 48 हजार मतांनी विजय मिळविला तर त्यांचे हात स्वर्गाला टेकले असं समजू नये. यांची औकात नरेंद्र मोदी यांनी ओळखली म्हणून मंत्री मंडळात स्थान दिलं नाही.

शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना राजकारणातून संपविण्याची ताकत शिवसैनिकांमध्ये आहे.' असं विनायक राऊतांनी म्हटलं आहे.

Vinayak Raut Vs Narayan Rane
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : 'त्यांना' मतांची सूज आलीय; संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला

तर नारायण राणेंनी केलेल्या विधानावर बोलताना 'या बकवासगिरीला आम्ही फार महत्व देत नाही. 2005 ला जे भाषण होतं तेच 2024 ला सुरु आहे, आम्ही त्यांच्या वक्तव्याची फार दखल घेत नाही. राज्यात जी भाजपा आणि महायुतीची अवस्था झाली आहे ती त्यांनी पाहावी.' असंही राऊत म्हणाले.

तसेच 'आज त्यांच्या पोटात जळफळाट होत आहे. त्यांच्या पोटातील कीड वळवळत आहे. सर्व समाज देशाच संविधानाच्या संरक्षणासाठी एकटवले आणि मोदींना 240 वर थांबवले आहे. आणि इंडिया आघाडीचा घोडा पुढे सरकवला आहे त्यामुळे त्यांची वळवळ बाहेर यायला लागली आहे.' अशी टीकाही केली.

Vinayak Raut Vs Narayan Rane
Video Narayan Rane News : स्ट्राइक रेट सांगणाऱ्या शिरसाटांची नारायण राणेंनी केली कानउघडणी; म्हणाले,...

याचबरोबर 'महायुतीत 100 टक्के बेबनाव आहे. कसं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला कचऱ्यात फेकून देतील ते बघा. शिंदे गटाची सुद्धा फार दयनीय अवस्था होईल.' असं भाकीत केलं. शिवाय 'मला त्यांच्यावर फार भाष्य करायचं नाही, असं म्हणत भुजबळांवरही प्रतिक्रिया दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com